आंतरधर्मीय विवाहात मुलगा मुस्लिमच का? कंगणाची पोस्ट व्हायरल

अखेर त्यांच्या नात्यामध्ये कटूता निर्माण झाली.
kiran rao and aamir khan
kiran rao and aamir khanfile image

मुंबई - सध्या बॉलीवूडमध्ये एकच चर्चा आहे ती म्हणजे आमीर (aamir khan) आणि त्याची पत्नी किरण राव (kiran rao) यांच्या घटस्फोटाची (divorce). गेल्या काही दिवसांपासून सोशल मी़डियावर त्यावरुन मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे. लगानच्या सेटवर आमीरची (aamir and kiran) आणि किरणची ओळख झाली होती. त्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यांनी लग्न झाले. काही वर्षे हे लग्न टिकले. अखेर त्यांच्या नात्यामध्ये कटूता निर्माण झाली. आणि आता त्यांनी एकमेकांपासून काडीमोड घेतला आहे. त्यावरुन बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगणानं आमीरच्या त्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (actress kangana ranaut about interfaith marriages while reacting to aamir khan kiran rao divorce)

कंगणा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. ती सतत चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. तिच्या वादग्रस्त स्वभावामुळे ती अनेकदा अडचणीत आली आहे. त्याचा फटकाही तिला बसला आहे. मात्र त्याचा काही एक परिणाम कंगणावर झालेला नाही. आता तिनं आमीर आणि किरणच्या घटस्फोटाविषयी चर्चा केली आहे. काही दिवसांपूर्वी आमीर आणि किरणनं सोशल मीडियावर आपली भूमिका व्यक्त करुन आपण घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले होते. त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

kangana post
kangana post Team esakal

कंगणानं त्यावर आपले मत मांडले आहे. तिनं इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेयर केली आहे. त्यात ती म्हणते, एके काळी पंजाबमधल्या परिवारांमध्ये एक मुलगा हिंदू आणि एक मुलगा मुसलमान होता. त्यावेळी दोन धर्मांमध्ये कधीही संघर्ष पाहायला मिळाला नाही. एवढेच बोलून कंगणा काही थांबली नाही. तिनं यापुढेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. आमीर सर यांच्या दुस-या घटस्फोटाबाबत मला नवल वाटले.

ज्यावेळी आंतरधर्मीय विवाह होतो तेव्हा मुलगा नेहमी मुस्लिम का असतो, महिला हिंदू म्हणून राहू शकत नाही का, आता बदलत्या काळाबरोबर हे नियम मोडणे गरजेचे आहे. आपण त्याकडे गांभीर्यानं लक्ष देत नाही. त्याचा त्रास अनेकांना सहन करावा लागतो आहे. आपण अजूनही फार प्राचीन काळात असल्या सारखे जगतो आहोत. त्यात काही सुधारणा व्हायला हव्यात.

kiran rao and aamir khan
काजोलच्या बहिणीने घेतला 'एग फ्रिजिंग'चा निर्णय; आता आई होण्याची चिंता नाही
kiran rao and aamir khan
'यापुढे सेटवर येऊन त्रास दिला तर..'; राजू सापतेंच्या आत्महत्येनंतर मनसे आक्रमक

आपल्या पोस्टच्या शेवटी कंगणानं लिहिलं आहे की, जर एखाद्या परिवारामध्ये हिंदू, जैन, बौध्द, शीख एकत्र राहू शकतात. तर एक मुस्लिम का नाही, असा प्रश्न तिनं विचारला आहे. मुस्लिम व्यक्तिशी विवाह करताना धर्म बदलण्याची गरज काय आहे, अभिनेत्रीच्या त्या पोस्टला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्या पोस्टला अनेकांनी शेयरही केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com