esakal | काजोलच्या बहिणीने घेतला 'एग फ्रिजिंग'चा निर्णय; आता आई होण्याची चिंता नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Tanishaa Mukerji

काजोलच्या बहिणीने घेतला 'एग फ्रिजिंग'चा निर्णय; आता आई होण्याची चिंता नाही

sakal_logo
By
स्वाती वेमूल

बॉलिवूड अभिनेत्री काजोलची बहीण आणि 'बिग बॉस' फेम अभिनेत्री तनिषा मुखर्जीने Tanishaa Mukerji आई होण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तनिषाने वयाच्या ३९ व्या वर्षीच 'एग फ्रीज' करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा खुलासा तिने नुकताच केला आहे. ३३ वर्षांची असतानाच तिला 'एग फ्रीज' करायचं होतं, मात्र त्यावेळी डॉक्टरांनी नकार दिल्याने तिने ३९ व्या वर्षी ती प्रक्रिया पूर्ण केली. तनिषा आता ४३ वर्षांची आहे. बाळाच्या जन्माची कोणतीच आशा नसेल तेव्हाच 'एग फ्रीज' करण्याचा सल्ला तिला डॉक्टरांनी दिल्याचं सांगितलं. त्याचप्रमाणे हा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक असून महिलांनी मूल जन्माला न घालणं, यात काहीच वाईट नसल्याचं ती म्हणाली. एग फ्रिजिंग ही एक वैद्यक्रिय प्रक्रिया आहे. यात स्त्री-बीज फलित न झालेल्या अवस्थेत अतिशीत तापमानात ठेवलं जातं. याआधी 'जस्सी जैसी कोई नहीं' फेम अभिनेत्री मोना सिंगनेही Mona Singh वयाच्या ३४ व्या वर्षी एग फ्रिजिंग केलं होतं. (Kajol sister Tanishaa Mukerji says she froze her eggs at 39)

"मला मूल नव्हतं आणि त्याबद्दलचे सर्व विचार माझ्या डोक्यात घोंघावत होते. त्यावेळी मला योग्य मार्गदर्शन मिळालं आणि वयाच्या ३९ व्या वर्षी मी एग फ्रीज केले. मात्र त्या सर्व प्रक्रियेदरम्यान माझं वजन खूप वाढलं होतं. फक्त वजनच वाढलं नव्हतं, तर त्यावेळी माझा चेहरासुद्धा उजळला होता. गरोदर महिलांच्या चेहऱ्यावर जो उजळ असतो, तो मला खूप आवडतो. मी माझ्या निर्णयाबद्दल खूप खूश आहे", असं तनिषाने सांगितलं.

हेही वाचा: "मुख्यमंत्र्यांनी राजू सापतेंच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा"

"खरंतर मी वयाच्या ३३ व्या वर्षीच डॉक्टरकडे गेले होते. पण त्यांनी मला त्यावेळी एग फ्रीज करण्यापासून थांबवलं. बाळाच्या जन्माची कोणतीच अपेक्षा नसेल तेव्हाच एग फ्रीज करण्याचा सल्ला त्यांनी मला दिला होता. पण हा माझा वैयक्तिक निर्णय आहे आणि सध्याच्या काळात मूल नसणं ही काही वाईट गोष्ट नाही. तुम्ही मुलांना दत्तक घेऊ शकता. पण याबद्दल मोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे. लग्न न करणं, रिलेशनशिपमध्ये न राहणं, या सर्व गोष्टी ठीक आहेत", असं ती पुढे म्हणाली.

तनिषाने २००३ साली 'श्श....' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने 'निल एन निक्की', 'सरकार', 'टँगो चार्ली' आणि 'वन टू थ्री' या चित्रपटांमध्ये काम केलं. २०१३ मध्ये तनिषाने बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये भाग घेतला होता. तिने 'खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता.

loading image