esakal | Video: विमानतळावर कंगनासाठी वेगळे नियम, 'नो मास्क मिळाली इंट्री'
sakal

बोलून बातमी शोधा

सेलिब्रेटींसाठी वेगळे नियम आहे का, विना मास्क कंगनाला मिळाली इंट्री

सेलिब्रेटींसाठी वेगळे नियम आहे का, विना मास्क कंगनाला मिळाली इंट्री

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनानं कोरोना प्रतिबंधक नियम जाहीर केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी त्या नियमांचे पालन न करणाऱ्याला दंडही ठोठावण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना फक्त सर्वसामान्य लोकांनाच कोरोनाचे नियम आहेत का असा प्रश्न अभिनेत्री कंगनाच्या त्या व्हिडिओमुळे ऐरणीवर आला आहे. बॉलीवूडमधील वादग्रस्त अभिनेत्री म्हणून कंगना प्रसिद्ध (kangana ranaut) आहेच. याशिवाय मनमानी करुन सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन न करुन तिनं पुन्हा एकदा आपण सर्वांपेक्षा वेगळे आहोत असे दाखवून दिले आहे. अर्थात ती त्या व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. कंगनासाठी वेगळ्या प्रकारचे नियम आहेत का, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. कंगनानं य़ापूर्वी देखील नो मास्कचा पुरस्कार केल्याचे दिसुन आले आहे.

कंगनाला मीडियाच्या काही फोटोग्राफर्सनं विमानतळावर फोटोत कैद केलं. त्यावेळी तिनं मास्क घातला नव्हता. विमानतळावर मास्कशिवाय प्रवेश नाही. अशा सुचनेचा बोर्ड त्या व्हिडिओमध्ये दिसतो. मात्र त्या नियमाकडे दुर्लक्ष करुन कंगना बिनधास्तपणे विमानतळाच्या दिशेनं जात असल्याचे व्हि़डिओमध्ये दिसुन य़ेते. भारत सरकारनं कोरोना प्रतिबंधक नियमांची काही नियमावली यापूर्वी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे. असे असताना देखील कंगनानं त्या नियमाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. याचे कारण यापूर्वी देखील ती अनेकदा विनामास्क दिसून आली आहे.

सेलिब्रेटींसाठी काही वेगळे नियम आहेत का, असा प्रश्न नेटकऱ्यांनी त्या व्हिडिओवरुन केला आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाचा तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित थलाईवी नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित होणार आहे. कंगनाच्या फॅन्सला तिचा हा चित्रपट खूप भावला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कंगनाच्या थलाईवीची चर्चा रंगली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंगनाला कोरोना झाला होता. त्यातून ती बरीही झाली. त्यानंतर देखील तिनं अशाप्रकारे कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणे नेटकऱ्यांनी उचलून धरले आहे.

हेही वाचा: अखेर कंगना कोर्टात हजर : जावेद अख्तर मानहानी प्रकरण

हेही वाचा: बोल्ड फोटोंमुळे कंगना ट्रोल; नेटकरी म्हणाले, "इतरांना शिकवतेस पण स्वत: .."

loading image
go to top