esakal | कंगना रनौत म्हणाली, 'मी मुंबईत येतेय, कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर..'
sakal

बोलून बातमी शोधा

kangana

अभिनेत्री कंगना रनौत बॉलीवूडच्या त्या अभिनेत्रींपैकी एक आहे ज्या सोशल मिडियावर खूप ऍक्टीव्ह असतात. ती अनेक मुद्द्यांवर तिची प्रतिक्रिया देत असते. नुकतंच कंगना आणि संजय राऊत यांच्यात ट्विटर वॉर सुरु होतं.

कंगना रनौत म्हणाली, 'मी मुंबईत येतेय, कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर..'

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- मुंबईची तुलना पाकिस्तानशी केल्याने बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत खूप ट्रोल झाली. बॉलीवूड सेलिब्रिटी, मराठी कलाकारांपासून ते चाहत्यांपर्यंत सगळ्यांनीच कंगनाच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत तिला चांगलंच सुनावलं. खूप ट्रोल झाल्यानंतर आता तिने याबाबत तिची प्रतिक्रिया दिली आहे. यात तिने म्हटलंय की ती मुंबईत येणार आहे कोणामध्ये हिंमत असेल तर थांबवून दाखवा.

हे ही वाचा: हॉलीवूड अभिनेता रॉबर्ट पॅटिनसन कोरोना पॉझिटीव्ह, 'द बॅटमॅन'चं शूटींग थांबवलं 

अभिनेत्री कंगना रनौत बॉलीवूडच्या त्या अभिनेत्रींपैकी एक आहे ज्या सोशल मिडियावर खूप ऍक्टीव्ह असतात. ती अनेक मुद्द्यांवर तिची प्रतिक्रिया देत असते. नुकतंच कंगना आणि संजय राऊत यांच्यात ट्विटर वॉर सुरु होतं. यावेळी तिने म्हटलं होतं की तिला मुंबई पोलिसांची भिती वाटते. यावर संजय राऊत यांनी तिला प्रत्युत्तर देत म्हटलं होतं की जर तिला मुंबईमध्ये भिती वाटते तर तिने परत येऊ नये. राऊत यांच्या या वक्तव्यावर कंगनाने उत्तर देत म्हटलं की मुंबई POK सारखी का वाटतेय? तिच्या या स्टेटमेंटनंतर तिच्यावर चारही बाजुने हल्ला होऊ लागला. सोशल मिडियावर तिच्याविरोधात ट्विट्स केले जाऊ लागले. या सगळ्यावर आता कंगनाने तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

कंगनाने तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की 'मी पाहतेय की बरेचसे लोक मला मुंबईत परत न येण्याची धमकी देत आहेत. म्हणून मी ठरवलं आहे की येणा-या आठवड्यात ९ तारखेला म्हणजेच ९ सप्टेंबरला मी मुंबईला जाईन. त्यावेळी मी एअरपोर्टला पोहोतल्यावर पोस्ट करेन. कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर मला अडवून दाखवावं. ' सोशल मिडियावर कंगनाचं हे ट्विट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तिचे चाहते तिला यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.   

kangana ranaut open challenge sanjay raut coming to mumbai on 9th september