
कंगणाचा व्टिटरवर एवढा राग असण्याचे दुसरे कारण म्हणजे तिच्या अकाऊंटवर यापूर्वी व्टिटरवर कारवाई केली होती.
मुंबई - कंगणाचा एक दिवस शांत जात नाही. दरदिवशी ती काही ना काही सोशल मीडियावर अपडेट करत असते. दोन दिवसांपूर्वी तिला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर तिनं त्यांच्यावर आगपाखड केली. राष्ट्रवादी असणा-यांना नेहमीच धारेवर धरले जाते. त्यांना एकटं पाडलं जातं. असे ती म्हणाली होती. आता कंगणानं थेट व्टिटरवरच टीका केली आहे. त्यामुळे रागाच्या भरात ती काय करु शकते याचा प्रत्यय यानिमित्तानं आला आहे.
कंगणाच्या वादगस्त वक्तव्याला अनेकजण कंटाळले आहे. तिचा वाचाळपणा काही केल्या थांबत नसल्यानं तिला कोणी प्रत्युत्तक करण्यास धजावत नाही. जे तिला प्रत्युत्तर देतात कंगणा त्यांना पुन्हा निरुत्तर करते. याला अपवाद कलाकार आणि गायक दिलजीत दोसांज याचा. त्यानं मात्र कंगणाला जशास तसे उत्तर देऊन जेरीस आणले होते. दिल्लीतील शेतक-यांच्या आंदोलनात शेतक-यांच्या बाजूनं उभा राहणा-या दिलजीतवर कंगणानं टीका केली होती. त्यावर दिलजीतनं खोचक शब्दांत कंगणाला सुनावले होते. सध्या कंगणाच्या तावडीत व्टिटर सापडले आहे. वास्तविक व्टिटरवर कंगणानं का टीका केली आहे हे कळायला काही मार्ग नाही.
No you don’t,Islamists nation and Chinese propaganda has bought you completely, you only stand for your petty gains. You shamelessly show intolerance for anything other than what they want. U are nothing but a little slave of your own greeds. Don’t preach again its embarrassing. https://t.co/jDn97OVrHU
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 10, 2021
जगात जे काही चालले आहे त्याच्यावर आपण व्यक्त झालेच पाहिजे या भावनेतून कंगणा कायम सोशल मीडिय़ावर व्यक्त होत असते. सध्या अमेरिकेत चाललेल्या अराजकतेवर तिनं बोट ठेवलं आहे. यात अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अधिक चर्चेत आहे. जगातल्या सर्वाधिक श्रीमंत अशा लोकशाही देशात जी अनागोंदी चालली आहे त्यावरुन वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यासाठी ट्रम्प यांना दोषी धरले आहे. व्टिटरनं तर त्यांचे अकाउंट काढून टाकले आहे. त्यावरुन अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
कंगणानं त्यामुळे व्टिटरवर टीका केली आहे.
कंगणा म्हणााली की, व्टिटरसारखा जो प्लॅटफॉर्म आहे तो आता इस्लामी भाग आणि चीनी प्रोपंगंडा यांना विकला गेला आहे. तसे तिनं लिहिले आहे. तुम्ही चीनी कंपन्यांना विकले गेले आहात असे कंगणानं लिहिले आहे. तुम्ही केवळ तुमच्या फायद्यासाठी भूमिका घेता. दुस-यांच्या विचाराप्रती तुमची सहिष्णूता संपली आहे. अशा शब्दांत तिनं टीका केली आहे. एवढ्यावरच कंगणा थांबलेली नाही. ती म्हणाली, सध्या व्टिटर हा गुलाम झाला आहे. त्यांनी उगाचच मोठ मोठे दावे करण्याची काही गरज नाही. त्यांचे वागणे हे लज्जास्पद म्हणावे लागेल. अशाप्रकारे कंगणानं थेट व्टिटरवर निशाणा साधला आहे.
कंगणानं यापूर्वीही सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर टीका केली होती. व्टिटरवरही तिनं आगपाखड केली होती. कंगणाचा व्टिटरवर एवढा राग असण्याचे दुसरे कारण म्हणजे तिच्या अकाऊंटवर यापूर्वी व्टिटरवर कारवाई केली होती.