
सोशल मीडियावर सैफ आणि करिनाच्या दुस-या मुलाचे नाव काय असणार या चर्चेला मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे.
मुंबई - बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री करिना कपूर दुस-यांदा आई झाली. तिला मुलगा झाल्याचा आनंद सध्या बॉलीवूड साजरा करत आहे. करिना आणि सैफच्या चाहत्यांनी त्या दोघांनाही मोठया प्रमाणावर शुभेच्छा दिल्या आहेत. तैमूरच्या भावाचे नाव काय ठेवायचे अशी चर्चा आता सुरु झाली आहे. त्यावरुन अनेकांनी वेगवेगळी नावं सुचविण्यास सुरुवात केली आहे. कोणी तैमूरच्या नावाचा संदर्भ देऊन तशाच प्रकारचे एखादे ऐतिहासिक नावं सुचविली आहेत.
सोशल मीडियावर सैफ आणि करिनाच्या दुस-या मुलाचे नाव काय असणार या चर्चेला मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे. वास्तविक आपल्या मुलाच्या अशाप्रकारच्या जाहिरातीमुळे सैफ आणि करिना दोघेही चांगलेच त्रस्त झाल्याचे दिसून आले आहे. त्यांनी त्याबद्दल अनेकदा ती खंत काही माध्यमांना बोलूनही दाखविली आहे. मात्र ते देशातील प्रसिध्द सेलिब्रेटी असल्यानं त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे माध्यमांचे बारकाईनं लक्षं असतं. गेल्या काही दिवसांपासून करिनाच्या बाळंतपणाची चर्चा सोशल मीडियावर होत होती. त्यात तिचे फोटोशुट, योगा करतानाचे व्हिडिओही व्हायरल झाले होते. त्याला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंटस मिळाल्या होत्या.
Kareena Kapoor Khan and Saif Ali Khan blessed with a baby boy, announces their relative Riddhima Kapoor Sahni
(file photo) pic.twitter.com/BhS7YIi8Mn
— ANI (@ANI) February 21, 2021
आता बाळाचे नामकरण काय करायचे यावरुन चर्चा रंगत असल्याचे पाहावयास मिळाले आहे. सोशल मीडियावर त्याबद्दल गंमतीशीर प्रतिक्रिया वाचायला मिळत आहे. अनेकांनी सैफ, करिनाच्या बाळाचे नाव एखाद्या ऐतिहासिक पुरुषाचे द्यावे असे म्हटले आहे. तर काहींनी सध्या देशाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून सैफच्या बाळाचे जन्माला येणे अतिशय भाग्याचे असल्याची मिश्किल टिप्पणी केली आहे. करिनाच्या दुसऱ्या बाळाच्या बातमीने फॅन्सला कमालीचा आनंद झाला आहे. काहींनी त्या दोघांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Name him Babar or Ghazni to piss off sanghis https://t.co/TtRZbJQ7y7
— doomsday (@Kaisersnoozy) February 21, 2021
या ट्रोलर्सना सैफ आणि करीनाने कोणतही उत्तर दिलं नसलं तरी काही नेटकऱ्यांनीच ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलंय. त्यामुळे सोशल मीडियावर वाद पेटला आहे. सैफ आणि करीनाच्या बाळाचं नाव काय असावं हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे. त्यावरुन वाद का घातला जातो आहे असा प्रश्न सैफ आणि करिनाच्या समर्थनार्थ चाहत्यांनी विचारला आहे. तैमूरनंतर औरंगजेब, बाबर किंवा महमंद घोरी, अहमद शहा अब्दाली नाहीतर खिलजी हे नाव ठेवावे. असे सुचवले आहे.