Karisma Kapoor: म्हातारी करिश्मा.. गेली पोज द्यायला झालं भलतंच.. बघा कशी दिसते आता.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress Karisma Kapoor trolled for her look netizens said very aged woman budhiya

Karisma Kapoor: म्हातारी करिश्मा.. गेली पोज द्यायला झालं भलतंच.. बघा कशी दिसते आता..

karisma kapoor: करिश्मा कपूर ही एकेकाळी बॉलीवूडमधील खूप प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिच्या अभिनयावर आणि तिच्या लुकवर करोडो फॅन फिदा व्हायचे. कपूर घराण्यात चौकटीबाहेर पडून स्वतःच वेगळं विश्व निर्माण करणारी करिश्मा ही पहिली मुलगी ठरली. घरातून वारसा असला तरी तिने आपल्या अभिनयावर आणि हिम्मतीवर स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने तिने अनेक चित्रपट गाजवले. पण आता ती पहिल्यासारखी चर्चेत राहिली नाही. नुकताच तिचा एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये तिला नेकऱ्यांनी चक्क 'म्हातारी' म्हंटलं आहे.

(actress Karisma Kapoor trolled for her look netizens said very aged woman budhiya)

हेही वाचा: Ashirwad Tuza Ekveera Aai: अभिनेत्री मयूरी वाघ, अमृता पवार एकवीरा आईच्या दर्शनाला..

आपल्या बिनधास्त अभिनयाने करिष्मा कपूरनची नेहमीच चर्चा होत असे. एकेकाळी फॅशन दिवा म्हणून तीची ओळख होती. दोन मुलांची आई झाली तरी करिष्मा कपूरने स्वतःला परफेक्ट ठेवले पण तिच्या एका व्हिडिओमुळे तिच्या या लुक वर निगीटिव कमेंट येत आहेत. नुकताच तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये तिला पाहून युजर्स ने जबरदस्त ट्रोल केले आहे. 

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

करिष्मा कपूरने व्हाईट अँड ब्लॅक कलरची कुर्ती आणि व्हाईट प्लाझो घातली आहे. तिचा हा लुक पाहून नेटकरी म्हणाले, "करिष्मा आता तुझे म्हातारपण दिसत आहे", तर दूसरा म्हणतो, " काय इतके पैसे कमवून‌पण बिना इस्त्री कपडे घातले आहेत", तर एकाने कमेंट केली आहे की," मेकअप केला तरी काय वय लपत नाही" तर काहीना करिष्माच्या कामाची पडली आहे "करिष्मा काय फिल्ममध्ये काम करत नाही ना तर ही जाते कुठे , फक्त मीडीयाला फोटो देण्यासाठी बाहेर येते.'' असे म्हंटले आहे. तर एकजण म्हणतो, 'श्रीमंतांना म्हातारपण येत नाही.'

ट्रोलर्स कडून या कमेंट येत असल्या तरी तिचे काही चाहते मात्र अजूनही तिच्या प्रेमात आहेत. कित्येक चाहत्यांनी तू खूप छान दिसत आहेस, तुझा लुक खूप आवडला आम्हाला.. अशाही कमेंट केल्या आहेत. तर कित्येकांनी रेड हार्ट इमोजी पाठवून आपले प्रेम व्यक्त केले आहे.