Ashirwad Tuza Ekveera Aai: अभिनेत्री मयूरी वाघ, अमृता पवार एकवीरा आईच्या दर्शनाला.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashirwad Tuza Ekveera Aai new serial on sony marathi cast mayuri wagh and amruta pawar

Ashirwad Tuza Ekveera Aai: अभिनेत्री मयूरी वाघ, अमृता पवार एकवीरा आईच्या दर्शनाला..

Ashirwad Tuza Ekveera Aai: समकालीन मालिकांबरोबरच 'ज्ञानेश्वर माउली', 'गाथा नवनाथांची'अशा भक्तिपर मालिकांच्या यशानंतर आता सोनी मराठी वाहिनी एकवीरा आईचा महिमा दाखवणारी 'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेवून येत आहे. नुकतेच या मालिकेतील कलाकारांनी देवीच्या मूळ स्थानी म्हणजेच कार्ला येथे जाऊन एकवीरा आईचे दर्शन घेतले.

(Ashirwad Tuza Ekveera Aai new serial on sony marathi cast mayuri wagh and amruta pawar)

हेही वाचा: Bigg Boss 16: वाइल्ड कार्ड एंट्री घेणारा फहमन खान कोण आहे? ज्याला पाहून सुंबूल वेडी झाली..

एकवीरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्यांजवळ आहे. आगरी- कोळी समाजासह अन्य लोकांचेही हे कुलदैवत आहे. पौराणिक कथेनुसार कार्ला येथील मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते. तसेच एकवीरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे. याच देवीचा महिमा सांगणारी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

हेही वाचा: Salim Khan Birthday: पत्नी, चार मुलं, घरातून विरोध असतानाही हेलनच्या प्रेमात वेडे होते सलीम खान..

'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' मालिकेतील कलाकारांनी कार्ला (लोणावळा) येथे एकवीरा आईचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. या नंतर आयोजित पत्रकार परिषदेस एकवीरा आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री मयूरी वाघ, अभिनेत्री अमृता पवार, मालिकेचे निर्माते दिग्पाल लांजेकर, लेखक आणि निर्माते चिन्मय मांडलेकर, सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर, सोनी मराठी फ़िकशन हेड - सोहा कुळकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

त्या व्यतिरिक्त या मालिकेत निषाद भोईर, अभिनय सावंत, सविता मालपेकर, मिलिंद सफई, धनंजय वाबळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' येत्या 28 नोव्हेंबरपासून सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' या मालिकेचे दिग्पाल लांजेकर यांनी लिहिलेले शीर्षक गीत अतिशय सुंदर झाले आहे. हे गीत केवल वाळंज आणि जुईली जोगळेकर यांनी गायले असून देवदत्त बाजी यांनी संगीतबद्ध केले आहे. एकवीरा आईचे भक्त या गीतावर नक्कीच ताल धरतील यात शंका नाही.

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: मी नाय त्यातली, कडी लाव आतली.. तेजस्विनी-अपूर्वामध्ये खडाजंगी..

'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' मालिकेतील भूमिकेबद्दल बोलताना अभिनेत्री मयूरी वाघ म्हणाली, या मालिकेत मी एकवीरा आईची भूमिका साकारत आहे. एकवीरा आईचे चमत्कार आपण ऐकले आहेत. अनेकांनी ते अनुभवले आहेत. संकटातून एकवीरा आई आपल्या भक्तांना कशी तारून नेते हे आता तुम्हाला आता पाहायलाही मिळणार आहेत. कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका साकाराव्या मिळाव्यात हे प्रत्येक कलाकाराला वाटत. आजपर्यंत मी अनेक भूमिका साकारल्या आहेत. मात्र एखादी पौराणिक भूमिका आपण करावी असं मला वाटत होत. त्याच वेळेस एकवीरा आईच्या आशीर्वादाने ही भूमिका चालून आली. यामध्ये एकवीरा आईची भूमिका साकारन ही खूप मोठी जबाबदारी आहे. एकवीरा आईच्या भक्तांना ही मालिके आवडेल अशी अपेक्षा आहे.

अभिनेत्री अमृता पवार म्हणाली, "आशीर्वाद तुझा एकवीरा आई' या मालिकेत तानिया नावाची भूमिका की साकारत आहे. एकवीरा आईचे लाखों भक्तगण आहेत. त्यातलीच एक तानिया असून तिची एकवीरा आईवर खूप श्रद्धा आहे. अनेक संकटातून एकवीरा आई तानियाला मार्ग दाखवते. हा भक्तिमय प्रवास लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे."