'सत्य डेबिट कार्ड सारखं असतं...': क्रांती रेडकरचा रोख कुणाकडे?|Actress Kranti Redkar tweet viral Sameer Wankhede | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Kranti Redkar tweet

'सत्य डेबिट कार्ड सारखं असतं...': क्रांती रेडकरचा रोख कुणाकडे?

NCB News: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Samir Wankhede) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि फसवणूक केल्याचे आरोप झाले होते. बॉलीवूडचा किंग खान शाहरुख याच्या मुलाला आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात झालेली अटक, (Bollywood News) त्याच्याबरोबर इतर सहकाऱ्यांवर केलेली कारवाई, त्यावरुन बदलेली राजकीय समीकरणं यामुळे समीर वानखेडे चर्चेत आले होते. त्यावरुन राष्ट्रवादीडे नवाब मलिक यांनी सातत्यानं पत्रकार परिषदा घेऊन वानखेडे (Bollywood Actor) यांच्यावर वेगवेगळे आरोप केले होते. नाव, जात, धर्म खोटं सांगुन त्यांनी सरकारी नोकरीत मिळवल्याचा घणाघाती आरोपही यावेळी (Social Media Viral) त्यांच्यावर झाला होता. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झालेल्या याप्रकरणात वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांनी वानखेडे यांची बाजु सावरली होती.

सध्या सोशल मीडियावर क्रांती रेडकर यांचं ट्विट व्हायरल झालं आहे. त्यांच्या त्या व्टिटचा रोख कुणाकडे आहे अशी चर्चा त्यावरुन रंगायला सुरुवात झाली आहे. यापूर्वी क्रांती रेडकर यांनी मलिक यांना जशास तसं उत्तर देऊन वानखेडे यांच्यावर झालेले आरोप फेटाळून लावले होते. आम्हाला बदनाम करण्याचा पद्धतशीर कट आखण्यात आला असून त्यानुसार सगळे घडत असल्याचे त्यांनी म्हटले होते. क्रांती यांनी खडसावून सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतलं होतं. वानखेडे यांच्यावर ज्यांनी आरोप केले त्यांना जशास तसं उत्तर देऊन आपली बाजु प्रभावीपणे मांडली होती.

हेही वाचा: Poster Viral: 'हरिओम' मधले ते दोन मावळे आहे तरी कोण?

समीर वानखेडे यांचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यांच्यावर आरोप करणारे मलिक हे सध्या ईडीच्या कारवाईअंतर्गत तुरुंगात आहे. यासगळ्या परिस्थितीत क्रांती यांचं ट्विट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यांनी आपल्या व्टिटमध्ये म्हटलं आहे की, सत्य डेबिट कार्ड की तरह होता है, पहले कीमत चुकाए बाद मे आनंद ले !, झूठ क्रेडिट कार्ड की तरह होता है, पहले आनंद ले फिर भुगतान करे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे की, क्रांती यांचा रोख नेमका कुणाकडे आहे. आपल्या परखड स्वभावामुळे क्रांती या नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. मराठी - हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही

Web Title: Actress Kranti Redkar Tweet Viral Sameer Wankhede Nawab Malik Controversy Users Comment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top