अभिनेत्री क्रिती सॅनन कोरोना पॉझिटीव्ह? चंदीगढमध्ये करत होती शूटींग

दिपाली राणे-म्हात्रे
Tuesday, 8 December 2020

 अभिनेत्री क्रिती सॅनन कोरोना संक्रम्रित झाल्याची माहिती समोर येत आहे. क्रिती चंदीगढमध्ये तिच्या आगामी सिनेमाचं शूट करत होती. 

मुंबई- देशात कोविड-१९ चा कहर दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. अनलॉक दरम्यान जिथे एकीकडे सिनेइंडस्ट्रीचं काम सुरु झालं आहे तर दुसरीकडे कोरोनाच्या खूप केसेस समोर येऊ लागल्या आहेत. नुकतंच 'जुग जुग जियो' सिनेमातच्या शऊटींग दरम्यान वरुण धवन, नितू कपूर, दिग्गर्शक राज मेहता कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते. आता मिडिया रिपोर्टनुसार अभिनेत्री क्रिती सॅनन कोरोना संक्रम्रित झाल्याची माहिती समोर येत आहे. क्रिती चंदीगढमध्ये तिच्या आगामी सिनेमाचं शूट करत होती. मात्र क्रितीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसून याबाबतची अधिकृत माहिती अजुन समोर आलेली नाही.

हे ही वाचा: अभिनेता फरदीन खानचं ट्रान्सफॉर्मेशन चर्चेत, १८ किलो वजन घटवलं

अभिनेत्री क्रिती सॅनन गेल्या काही दिवसांपासून अभिनेता राजकुमार रावसोबत तिच्या आगामी सिनेमाचं शूट करण्यासाठी चंदीगढमध्ये होती. तिने नुकतंच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमधून सांगितलं होतं की तिच्या सिनेमाचं शूटींग संपलं आहे आणि ती घरी परतली आहे. मात्र मुंबईत परतल्यावर पपराझीसाठी फोटो देताना तिने एका मिनिटासाठी देखील मास्क काढण्यास नकार दिला. या दरम्यान फिल्मफेअरच्या एका रिपोर्टमध्ये सुत्रांच्या माहितीनुसार असं सांगण्यात आलं आहे की क्रिती सॅननला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यावर क्रिती सॅनन किंवा तिच्या टीमकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. 

क्रितीविषयीची ही बातमी कळताच तिच्या चाहत्यांमध्ये काळजीचं वातावरण आहे. तिचे चाहते ती लवकर ठीक व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. क्रितीच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचं झालं तर ती 'मिमी' या तिच्या आगामी सिनेमात पंकज त्रिपाठी आणि सई ताम्हणसोबत दिसणार आहे. या सिनेमात ती सरोगेट आईची भूमिका साकारेल. तसंच क्रिती प्रभासच्या आगामी 'आदिपुरुष' सिनेमात सितेच्या भूमिकेत असल्याचंही कळतंय.    

actress kriti sanon tested positive for covid 19 was shooting for film in chandigarh  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress kriti sanon tested positive for covid 19 was shooting for film in chandigarh