esakal | अभिनेता फरदीन खानचं ट्रान्सफॉर्मेशन चर्चेत, १८ किलो वजन घटवलं
sakal

बोलून बातमी शोधा

fardeen khan

१९९८ साली फरदीनने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नुकतेच सोशल मिडियावर त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमधून स्पष्ट दिसून येतंय की फरदीनने त्याचं वजन खूप कमी केलं आहे. 

अभिनेता फरदीन खानचं ट्रान्सफॉर्मेशन चर्चेत, १८ किलो वजन घटवलं

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- बॉलीवूड अभिनेता फरदीन खान गेल्या अनेक काळापासून बॉलीवूडमधून गायब आहे. १९९८ साली फरदीनने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नुकतेच सोशल मिडियावर त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमधून स्पष्ट दिसून येतंय की फरदीनने त्याचं वजन खूप कमी केलं आहे. 

हे ही वाचा: दिव्या भटनागरच्या निधनानंतर देवोलिनाला अश्रु अनावर, दिव्याच्या पतीला दिली धमकी 

अभिनेता फरदीन खानचं मध्यंतरी अचानक वजन वाढल्यामुळे तो बेढब दिसत होता. त्याच्या अतिवजनामुळे तो खूप ट्रोल झाला होता. मात्र आता तो पुन्हा एकदा त्याच्या वजनामुळेच चर्चेत आला आहे. मात्र यावेळी अतिवजनामुळे नाही तर वजन घटवल्याने तो चर्चेत आहे. फरदीन खानने त्याच्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली आहे. तो त्याच्या नव्या फिट लूकमध्ये खूप हँडसम दिसत आहे. त्याचा हा नवा लूक चाहत्यांना खूप पसंत पडला आहे. 

फरदीन खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की 'मी माझं १८ किलो वजन कमी केलं आहे आणि मी या लूकमुळे खूप आनंदी आहे. मी कधी मुंबई तर कधी लंडनमध्ये असतो. मात्र हो मी माझा जास्तवेळ लंडनमध्ये घालवला आहे. माझे हे फोटो या गोष्टीची हिंट देतात की मी इंडस्ट्रीमध्ये पुन्हा येतोय. शुक्रवार ११ डिसेंबर रोजी माझ्या मुलीचा वाढदिवस असतो. तेव्हा मी काही दिवसांसाठी लंडनला जातोय आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात परत येणार आहे. मी गेल्या एक महिन्यापासून मुंबईतंच आहे.'

फरदीनच्या या नव्या लूकनंतर अशी चर्चा आहे की तो लवकरंच कमबॅक करणार आहे. फरदीन 'दिल बेचारा' फेम दिग्दर्शक मुकेश छाब्रासोबत सिनेमा करणार असल्याचं कळतंय. त्याच्या या 'फॅट टू फिट' प्रवासाची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे.   

fardeen khan looks more handsome after losing 18 kg see photos  

loading image
go to top