esakal | 'मद्रास कॅफे'च्या अभिनेत्रीला अटक, २०० कोटी खंडणी प्रकरणात केली बॉयफ्रेंडची मदत
sakal

बोलून बातमी शोधा

'मद्रास कॅफे'च्या अभिनेत्रीला अटक, २०० कोटी खंडणी प्रकरणात केली बॉयफ्रेंडची मदत

'मद्रास कॅफे'च्या अभिनेत्रीला अटक, २०० कोटी खंडणी प्रकरणात केली बॉयफ्रेंडची मदत

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'मद्रास कॅफे' Madras Cafe चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री लीना मारिया पॉल Leena Maria Paul हिला दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. २०० कोटींच्या खंडणीप्रकरणात लीनाविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. हे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. खंडणी प्रकरणात सुकेश चंद्रशेखरचं नाव उघड झाल्यानंतर आता लीनाविरोधात सबळ पुरावे असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. लीना ही सुकेशची गर्लफ्रेंड आहे. एआयडीएमकेचे निवडणूक चिन्ह मिळवून देण्याच्या आरोपाखाली सुकेश सध्या तिहार जेलमध्ये आहे.

खंडणी प्रकरणात लीनाचा सक्रीय सहभाग असल्याचे सबळ पुरावे तपास यंत्रणांना सापडले आहेत. लीनावर फोर्टीस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांची पत्नी अदिती सिंगला फसवण्यात सुकेशला मदत केल्याचा आरोप आहे. जेव्हा सुकेशने कायदा मंत्रालयातील वरिष्ठ सरकारी अधिकारी असल्याचं भासवत अदिती सिंग यांना कॉल केला होता, तेव्हा तो कॉल लीनानेच ट्रान्सफर केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. लीनाच्या अटकेची ही पहिलीच घटना नाही. याआधीही ईडीने तिची अनेकदा चौकशी केली होती.

हेही वाचा: RSS ची माफी मागेपर्यंत जावेद अख्तरांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही- भाजपा आमदार

नेमकं काय आहे प्रकरण?

रेलिगेअर कंपनीचे प्रमोटर मलविंदर आणि शिविंदर सिंग यांना जेलमधून बाहेर काढण्यासाठी सुकेशने त्यांच्या पत्नींसोबत मिळून एक डील केली होती. यासाठी सुकेशने त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळले होते. मलविंदरची पत्नी जापना आणि शिविंदरची पत्नी अदिती यांनी याबाबत गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. पतींना कारागृहातून बाहेर काढण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये उकळल्याची तक्रार त्यांनी केली होती.

loading image
go to top