मधुबालाच्या प्रेमात पडला होता 'डॉन', माहितीये?

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 23 February 2021

मधुबालाच्या प्रेमात एक प्रसिध्द डॉन पडला होता. त्यावेळी त्याची कथा सगळीकडे चर्चिली जात होती.

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून मधुबालाच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. आज तिची पुण्यतिथी आहे. 23 फेब्रुवारी 1969 मध्ये एका आजारानं तिला हिरावून घेतलं. वयाच्या केवळ 36 व्या वर्षी तिनं अखेरचा श्वास घेतला. मधुबालाच्या प्रेमात एक प्रसिध्द डॉन पडला होता. त्यावेळी त्याची कथा सगळीकडे चर्चिली जात होती. तो डॉन कोण होता याविषयी जाणून घेऊया.

हे जगजाहिर आहे की, बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींवर वेगवेगळ्या डॉनचा जीव जडला होता. मात्र आता आपण अशा डॉनविषयी बोलणार आहोत ज्याने कोणेएकेकाळी मुंबईवर आपली हुकूमत गाजवली होती. सगळेजण त्याला घाबरत होते. त्याची मोठी दहशत होती. हा डॉन प्रसिध्द अभिनेत्री मधुबालावर प्रचंड प्रेम करत होता. त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. तिला मिळवण्यासाठी त्यानं खुप प्रयत्नही केले. त्या डॉनचे नाव हाजी मस्तान असे होते. तो मुंबईचा बादशहा होता.

हाजी मस्तानला मधुबाला फार आवडायची. तो तिचा दिवाना होता. मधुबालासाठी त्याची दिवानगी एवढी होती की तो तिच्याबरोबर लग्न करायला तयार झाला होता. त्या दोघांमध्ये मैत्रीही होती. मात्र मधुबालाला आपल्या मनातील सांगण्यापूर्वीच तिचं निधन झाले होते. मस्तनाचं स्वप्न अपूर्ण राहिलं. मधुबालाच्या जाण्यानं हाजी मस्तानला मोठा धक्का बसला होता. मात्र मधुबालाच्या जाण्यानं सोना नावाच्या एका अभिनेत्रीची लॉटरी लागली होती. ती हुबेहुब मधुबालासारखी दिसायची. तिनं जेव्हा बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा अनेकांना असे वाटले की मधुबाला परत आली आहे. सोनासाठी हाजी मस्तानने खुप पैसे खर्च केले. मात्र तिचे चित्रपट काही चालले नाहीत.

हाजी मस्तान हे विवाहित होते. मात्र त्याचा परिणाम त्या दोघांच्या नात्यावर काही झाला नाही. मधुबालाच्या हद्याला छेद होता. त्यामुळे ती जास्त काळ जगु शकली नाही. तिला गंभीर आजार झाला. मधुबालाचा आजार एवढा वाढला होता की, ती नऊ वर्षे अंथरुणाला खिळून होती. 
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress madhubala death anniversary madhubala and haji mastan untold story