Mahhi Vij:धडक तर धडक,अभिनेत्रीला शिवीगाळ करत बलात्काराचीही धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actress mahhi vij shared a shocking posyt on her twitter

धडक तर धडक,अभिनेत्रीला शिवीगाळ करत बलात्काराचीही धमकी

अभिनेत्री माही विज ही सिनेसृष्टीत सध्या सक्रिय नसली तरी या अभिनेत्रीच्या व्हिडिओ आणि सोशल मीडियाच्या पोस्टमुळे ती चर्चेत असते.तीच्या मुलीसोबत ती निरनिराळे व्हिडिओ करत तीच्या इन्स्टाग्रान अकाऊंटला शेअर करत असते.(Tv Actress)त्यामुळे ती कायमच चाह्त्यांच्या नजरेत असते.अलीकडेच या अभिनेत्रीसोबत घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा तीने खुलासा केलाय.

नुकतंच मुंबईत भर रस्त्यात माहीच्या गाडीला धडक दिल्याची घटना समोर आली आहे. इतकंच नव्हे तर त्या व्यक्तीने मला शिवीगाळ करत बलात्काराची धमकी दिल्याचा धक्कादायक आरोपही तिने केला आहे.याबाबतची माहिती देत माहीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केलाय.हा व्हिडिओ तिने तीच्या ट्वीटर अकाऊंटला पोस्ट केलाय.हा व्हिडीओ ७ मे चा आहे.हा व्हिडिओ पोस्ट करत तीने या व्यक्तीवर शिवीगाळ आणि बलात्काराची धमकी देत असल्याचा आरोप केलाय.

माहीच्या या ट्वीटरवर मुंबई पोलीसांनी तातडीने उत्तर दिले आहे.“तुम्ही जवळील पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करा, याची दखल घेतली जाईल”, असे त्यांनी या ट्विटला उत्तर देताना म्हटले आहे. विशेष म्हणजे ही सर्व घटना घडली त्यावेळी तिच्यासोबत तिची मुलगी ताराही सोबत होती.

या घटनेच्या माहितीनंतर चाहते संतप्त झाले आहे.तिच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर अनेकांनी अभिनेत्रीच्या धाडसाचे कौतुक केले.तसेच अशा लोकांचा त्रास अजिबात सहन करु नये असा सल्लाही चाहते तिला देताना दिसत आहे.