Manasi Naik Husband: मला काहीही फरक पडत नाही.. मानसी नाईकच्या पतीची पोस्ट.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress manasi naik husband pradeep kharera shared post between divorce process

Manasi Naik Husband: मला काहीही फरक पडत नाही.. मानसी नाईकच्या पतीची पोस्ट..

Manasi Naik: मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक सध्या बरीच चर्चेत आहे. ही चर्चा तिच्या गाण्याची किंवा चित्रपटाची नाही तर तिच्या घटस्फोटाची आहे. मानसी आपला पती प्रदीप खरेरा याच्यापासून विभक्त होत आहे. घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली असून तिने प्रदीपवर फसवणुकीचाही दावा केला आहे. या सगळ्या प्रकरणात आता तिच्या नवऱ्याची पोस्ट चर्चेत आली आहे.

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: बाबो! तेजस्विनी लोणारी साठी चक्क रणवीर सिंगची पोस्ट.. म्हणाला..

गेली काही दिवस मानसी नाईकचा पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता त्याची खात्रीही झाली आहे. मानसी नाईकने नुकतीच घटस्फोटासाठी अर्ज केल्याची कबुली दिली आहे. यानंतर तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत आपल्या पतीला टोले लगावले. आता मात्र आता तिच्या पतीने एक पोस्ट शेअर केली आहे.

प्रदीप सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. नुकताच त्याने एक फोटो शेअर केला आहे. ज्याला दिलेले कॅप्शन हे थेट मानसीला टोला लगावणारे आहे. ज्यात त्याने असं म्हंटल आहे की ‘लोक आपलयाविषयी काय विचार करतात याने मला काहीही फरक पडत नाही, कारण मला माहितेय मी कोण आहे आणि याचा मला अभिमान आहे.’ अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ही पोस्टमध्ये एकप्रकारे मानसीला दिलेले उत्तरच आहे.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांनी १९ जानेवारी २०२१ मध्ये लग्न केलं. फेब्रुवारी २०२० मध्ये मानसीने त्यांच्या नात्याची कबुली दिली होती. ते लग्नाआधीही काही काळ एकत्र होते. tयानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. लग्नानंतर सुरवतीचे काही दिवस खूपच चांगले गेले. मानसी अगदी सातत्याने नवऱ्यासोबत फोटो, व्हिडिओ पोस्ट करत होती. पण एक दिवस तिने अचानक त्याचे सर्व फोटो सोशल मिडीयावरून काढून टाकले,आणि ही घटस्फोट प्रकरण उघडकीस आले.

मानसी नाईक एक अभिनेत्री आहे. तिचे करियर चित्रपटात फारसे होऊ शकले नाही पण तिने गाण्यांवर मात्र वेगळीच छाप उमटवली. ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ आणि नुकतेच आलेले 'बाई एकदम कडक' या गाण्यांनी तिला चांगलीच प्रसिद्धी दिली. तर प्रदीप हा मूळचा हरियाणाचा असून तो मॉडेल आणि बॉक्सरदेखील आहे.

टॅग्स :Manasi Naik