Bigg Boss Marathi 4: बाबो! तेजस्विनी लोणारी साठी चक्क रणवीर सिंगची पोस्ट.. म्हणाला.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actor ranveer singh support bigg boss marathi 4 contestant tejaswini lonari

Bigg Boss Marathi 4: बाबो! तेजस्विनी लोणारी साठी चक्क रणवीर सिंगची पोस्ट.. म्हणाला..

ranveer singh on tejaswini lonari बिग बॉस मराठी चौथा सीझनचा अर्धा टप्पा पूर्ण केला आहे. हा खेळ जिंकण्यासाठी घरातील सदस्य जीव तोडून मेहनत घेत आहेत. दिवसेंदिवस बिग बॉस मराठी रंजक बनत आहे. बिग बॉसला मराठीला महाराष्ट्रातली मराठी जनता पसंत करतेच आहे पण आता बॉलिवूड स्टारने देखील मराठी बिग बॉसमधील सदस्याला सपोर्ट केला आहे. खरतर एका सदस्यासाठी बॉलीवुडस्टारने पोस्ट करणं ही मोठी बाब आहे, असेच काहीसे अभिनेत्री तेजस्विनी लोणारीच्या बाबतीत झाले आहे.

(actor ranveer singh support bigg boss marathi 4 contestant tejaswini lonari)

हेही वाचा: Karisma Kapoor: म्हातारी करिश्मा.. गेली पोज द्यायला झालं भलतंच.. बघा कशी दिसते आता..

बॉलीवुड स्टार आणि सतत उत्साही असणारा अभिनेता रणवीर सिंगने तेजस्विनी लोणारीला सपोर्ट केला आहे. यावरून दिसून येते की बॉलिवूडमध्ये देखील मराठी बिग बॉसची क्रेझ आहे. रणवीरने एका व्हिडिओमार्फत तेजस्विनीला चिअर अप केले आहे. 'तेजू मस्त खेळत आहेस, ५० दिवस मस्त पार केले आहेस.. आम्ही तुला मिस करत आहोत, पण तू जिंकुन ये. तू जिंकून आल्यानंतर एकत्र पार्टी करू' असे तो म्हणाला आहे. शिवाय महेश मांजरेकर यांना देखील त्याने शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: मी नाय त्यातली, कडी लाव आतली.. तेजस्विनी-अपूर्वामध्ये खडाजंगी..

तेजस्विनी लोणारीची पहिल्या दिवसापासून खेळी वेगळीच आहे. प्रत्येक टास्क ती पूर्ण ताकदीने खेळतेच शिवाय घरात प्रत्येकाला ती चांगल्या मैत्रीच्या नात्याने समजुन घेते. नुकताच झालेला राणी मुंगीचा टास्क पण तेजस्विनीने उत्तम रीतीने खेळला. तिच्या खेळाचे सर्वांनी प्रचंड कौतुक केले. यासाठी संचालक किरण मानेने तिला पहिल्या नंबरच मेडल देखील दिलं.

दरम्यान यंदा बिग बॉसचे चौथे पर्व विविध कारणांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. हे पर्व सुरु झाल्यापासून त्यात दिवसेंदिवस येणारे ट्विस्ट, स्पर्धकांचे मतभेद, कामांवरुन होणारे वाद आणि त्यांचा खेळ यावरुन बिग बॉसचे चौथे पर्व गाजताना दिसत आहे. यंदा बिग बॉसचे पर्व ऑल इज वेल या थीमवर आधारित आहे. सध्या मराठी बिग बॉसचा अर्ध शतक पूर्ण झाले आहे तर पूर्ण शतक कोण मारेल हे लवकरच समजेल.