esakal | मिनाक्षी शेषाद्रीच्या निधनाच्या अफवा; सोशल मीडियावर चर्चा

बोलून बातमी शोधा

meenakshi seshadri
मिनाक्षी शेषाद्रीच्या निधनाच्या अफवा; सोशल मीडियावर चर्चा
sakal_logo
By
स्वाती वेमूल

८० आणि ९०च्या दशकात चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री Meenakshi Seshadri हिच्या निधनाची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली आहे. रविवारी संध्याकाळपासून मिनाक्षीच्या निधनाविषयीचा मेसेज फिरू लागला आहे. सध्या कोरोनाची Corona दुसरी लाट देशभरात असल्याने कोरोनामुळे तिचा मृत्यू झाल्याचंही म्हटलं जात होतं. मात्र या सर्व चर्चांना स्वत: मिनाक्षीने उत्तर देत पूर्णविराम दिला आहे. तिने सोशल मीडियावर स्वत:चा फोटो पोस्ट केला आहे. मिनाक्षी सध्या पती आणि दोन मुलांसोबत अमेरिकेत राहते. टेक्सासचं लोकेशन टाकत मिनाक्षीने स्वत:चा 'डान्स पोझ'मधला फोटो पोस्ट केला आहे. (Actress Meenakshi Seshadri Quashes her Death Rumours)

मिनाक्षीने १९८३ मध्ये 'पेंटर बाबू' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. १९८३ मध्येच 'हिरो' या चित्रपटामुळे ती प्रकाशझोतात आली. या चित्रपटात तिने जॅकी श्रॉफसोबत भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने बऱ्याच सुपरहिट चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. 'मेरी जंग', 'घायल', 'घातक', 'दामिनी' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं.

हेही वाचा : 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त'मधील कलाकाराचा कोरोनामुळे मृत्यू

बँकर हरिश मैसोरशी लग्न केल्यानंतर ती १९९५ मध्ये बॉलिवूड आणि चित्रपटांपासून दूर गेली. लग्नानंतर मिनाक्षी अमेरिकेत स्थायिक झाली. मिनाक्षीला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. टेक्सासमध्ये ती इतरांना नृत्याचं प्रशिक्षण देते. भरतनाट्यम, कथ्थक आणि ओडिसी असे भारतीय नृत्यप्रकार ती तिथे शिकवते.