esakal | मिनिषावर पैसे 'लांब'विल्याचा आरोप, मालकीणीनं काढलं घराबाहेर
sakal

बोलून बातमी शोधा

actress minisha lamba

मिनिषावर पैसे 'लांब'विल्याचा आरोप, मालकीणीनं काढलं घराबाहेर

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडची अभिनेत्री (bollywood actress) मिनिषा लांबा (minisha lamba) फार काळ प्रेक्षकांच्या लक्षात राहिली नाही. याचे कारण तिचा अभिनय आणि तिला मिळालेले चित्रपट. काही निवडक चित्रपटांमध्ये (movie) तिनं अभिनय केला होता. त्याला अल्पसा प्रतिसाद मिळाला. मात्र त्यामुळे ती काही प्रेक्षकांच्या आवडीची अभिनेत्री झाली नाही. आता ती चर्चेत आली आहे याचे कारण म्हणजे तिच्यावर झालेला चोरीचा आरोप. तिनं आपली संघर्षगाथा सांगितली आहे. (actress minissha lamba struggle story says accused of stealing money)

मिनिषानं (minisha) सांगिलंय, माझ्यावर चोरीचा आरोप झाला होता. त्यामुळे मालकीणनं घराबाहेर काढल होतं. यासगळ्याचा मला मानसिक त्रास झाला होता. बॉलीवूडमध्ये तिची गाडी फार वेळ रुळावर चालली नाही. ती जेवढ्या वेगानं या क्षेत्रात आली तेवढ्याच वेगानं ती निघूनही गेली. दिल्लीतून आलेल्या मिनिषानं आपलं नशीब आजमवण्यासाठी मुंबईत प्रवेश केला. मात्र तिच्या हाती फार काही यश लागलं नाही. तिनं एका वृत्तवाहिनीला दिलेल्य़ा मुलाखतीमध्य़े आपल्या प्रवासाविषयी सांगितलं.

रेडिओ होस्ट सिद्धार्थ कन्ननशी (sidhartha kananan) तिनं बातचीत केली होती. त्यात मिनिषा म्हणाली, जेव्हा मी मुंबईला आले होते तेव्हा माझ्याकडे फार कमी पैसे होते. एकाकडे पीजी म्हणून मी राहत होते. त्याचे भाडे पाच हजार रुपये होते. त्यावेळी त्या घरमालकीणीनं माझ्यावर चोरीचा आरोप केला होता. मी तिच्या कपाटातून पैसे चोरल्याचे तिचे म्हणणे होते. मी ते आरोप मान्य केले नाही म्हणून तिनं मला ते घर सोडायला सांगितले होते.

हेही वाचा: खासदार नुसरत जहाँचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो व्हायरल

मी आता पुन्हा एका वेगळ्या संकटात सापडले होते. माझ्याकडे काही पैसे नव्हते. अशावेळी काय करावं असा प्रश्न मला पडला होता. मला महागड्या घरात राहता येणार नव्हते. तेव्हा त्या घराचे भाडे सात हजार रुपये होते. आणि मला ते देता येणार नव्हते. मॉडेलिंगनंतर मिनिषानं शूजित सरकार यांच्या यहा नावाच्या चित्रपटापासून सुरुवात केली होती. तिच्या त्या चित्रपटातील भूमिकेचं कौतूक झालं होतं.

loading image
go to top