esakal | मौनी रॉयचा 'गुलाबी' कपड्यांत 'सनसेट क्लिक'...

बोलून बातमी शोधा

actress mouni roy share amazing pictures

मौनी रॉयचा 'गुलाबी' कपड्यांत 'सनसेट क्लिक'...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये अशा काही सेलिब्रेटी आहेत ज्या आपल्या टँलेटमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. त्यात अभिनेत्री मौनी रायचेही नाव घ्यावे लागेल. तिनं तिच्या फोटोशुटमुळे गेल्या काही वर्षांपासून मोठा फॉलोअर्स जमवला आहे. त्यामुळे अनेकदा तिच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा असते. आताही ती तिच्या अशाच एका फोटोशुटमुळे क्लिक झाली आहे. पिंक ड्रेसमधील सनसेटच्या वेळी केलेलं ते फोटोशुट सर्वांच्या पसंतीस पडले आहे. त्या फोटोला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सही केल्या आहेत. माझ्या फोटोंवर प्रेम करा. अशाप्रकारची कॅप्शन देऊन मौनी लाईमलाईटमध्ये आली आहे.

मौनीच्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ती गेल्या काही महिन्यांपासून भारताबाहेर आहे. ती दुबईमध्ये आपला वेळ व्यतीत करत आहे. त्यानिमित्तानं वेगवेगळया ठिकाणी फोटोशुट करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करताना दिसते. मात्र सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहण्यात मौनी आघाड़ीवर असते. असे आतापर्यतचे तिच्या फॅन्सचे निरिक्षण आहे. सध्या तिचं पिंक ड्रेस फोटोशुट फेमस होताना दिसत आहे. त्यात ती कमालीची सुंदर दिसते आहे. तिच्या चाहत्यांनाही या बंगाली बालाचं कौतूक आहे.

मौनीचं लेटेस्ट फोटोशुट हे दुबईतील असल्याचं तिनं सांगितलं होतं. यावेळी तिनं सनसेटच्या वेळई काही फोटो काढले आहेत. त्या फोटोमधील मौनीचा लुक भलताच सुंदर दिसत आहे. तिच्या त्या फोटोंना सोशल मीडियावर उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. अनेक युझर्सनं तिच्या त्या लुकचे कौतूक केले आहे. सनसेटच्या फोटोशुटचा मौनीनं आनंद घेतला आहे. त्यामुळे ती सर्वांच्या कौतूकाचा विषय आहे. वेगवेगळ्या फोटोंमधील मौनीचा लुक अनेकांना चांगलाच भावला आहे. त्यांनी तिला कमेंट देऊन तिचा उत्साह वाढवला आहे.

मौनीनं त्या फोटोंना सोशल मीडियावर शेअर करताना त्याला कॅप्शन दिली आहे. तिनं लिहिलं आहे की, पृथ्वीवर जेवढं प्रेम करतो तेवढचं आपण ते आपल्यावर केलं पाहिजे. ते जास्त गरजेचं आहे. तिनं यावेळी वसुंधरा दिनाविषयी चाहत्यांना पर्यावरण रक्षणाचे आवाहनही केले आहे. त्यामुळे तिच्यावरही कौतूकाचा वर्षाव होताना दिसून आले आहे. यापूर्वीही अनेक सेलिब्रेटींनी वसुंधरा दिनाच्या निमित्तानं आपल्या चाहत्यांना पर्यावरण संवर्धनाचे आवाहन केल्याचे दिसून आले आहे. याशिवाय आपण कशाप्रकारे भविष्यात पर्यावरणाचे संरक्षण करु शकतो याविषयी सांगितले आहे.