Mrunmayee Deshpande, Sandeep Khare
Mrunmayee Deshpande, Sandeep KhareInstagram

गीतकार संदीप खरे आणि अभिनेत्री मृणमयी देशपांडे रंगवणार नल-दमयंती

लेखक आनंद नीलकंठन यांनी लिहिलेला हा 'ऑडिओ ड्रामा' मराठीसह एकूण नऊ भारतीय भाषांमध्ये ऐकायला मिळणार आहे.
Published on

काल्पनिक आणि पौराणिक कथा आपल्या विलक्षण शैलीत शब्दबद्ध करून तमाम साहित्यप्रेमीच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण करणारे नेटफ्लिक्सवरील 'बाहुबली' सिरीजचे लेखक आनंद नीलकंठन हे पहिल्यांदाच त्यांच्या विलक्षण शैलीत 'ऑडिओ ड्रामा' घेऊन येत आहेत. स्टोरीटेल ओरिजनलसाठी त्यांनी "नल- दमयंती" या मूळ इंग्रजीतील नव्याकोऱ्या 'ऑडिओ ड्रामा'ची लेखन निर्मिती केली असून आता हा 'ऑडिओ ड्रामा' मराठीसह एकूण नऊ भारतीय भाषांमध्ये ऐकायला मिळणार आहे. मराठीत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे(Mrunmayee Deshpande), कवी, गीतकार अभिनेते संदीप खरे(Sandeep Khare) यांच्या सुरस आवाजात ‘नल- दमयंतीचा ऑडिओ ड्रामा' ऐकण्यास मिळणार आहे.

Nal-Damyanti Poster image
Nal-Damyanti Poster imagegoogle

आनंद नीलकंठन यांची 'ऑडिओ ड्रामा' लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे. या लेखनाचा अनुभव कथन करताना ते म्हणतात “ऑडिओ ड्रामा तयार करणे हा एक आव्हानात्मक अनुभव होता. मी कादंबर्‍या आणि स्क्रिप्ट्स लिहिल्या आहेत, पण ‘ऑडिओ ड्रामा’ लिहिणं वेगळं आहे कारण ऐकणार्‍याच्या मनात व्हिज्युअल तयार करू शकतील अशा आवाजांवरही ‘ऑडिओ ड्रामा’ लेखन करताना लक्ष केंद्रित करावं लागतं. "नल- दमयंती" या ऑडिओ ड्रामासाठी शब्दांची निवड करताना स्वतःचा कस लागला आहे. माझ्यासाठी हा एक नवीन शिकण्याचा अनुभव होता आणि मी प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला”

Mrunmayee Deshpande, Sandeep Khare
सायरा बानो यांनी होकार दिला अन् धर्मेंद्र फसले;काय घडलं होतं?

“नल दमयंती ही एक जुनी कथा आहे जी महाभारत, कथासरितसागर आणि अनेक लोककथांमध्ये आढळते. माझे पुर्नकथन नलाऐवजी दमयंतीवर केंद्रित आहे. ती एक प्रेरणादायी पात्र आहे आणि तिचा स्त्रीवाद जितका आधुनिक आहे तितकचं तिचं पात्रही तेजस्वी आहे. मला आशा आहे की माझ्या या चिरंतन प्रेमकथेचे सादरीकरण, विनोदाने भरलेले असून श्रोत्यांना त्यांच्या मनात आधुनिक अॅनिमेशन चित्रपट पाहत असल्याची कल्पना करण्यास मदत करेल.”असंही आनंद नीलकंठन म्हणाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com