
ऋषी कपूरच्या आठवणीत नीतू कपूरची भाऊक पोस्ट,'डान्स दिवाने ज्युनिसर्स'च्या मंचावर अनावर झालेत अश्रू..
हिंदी सिनेमासृष्टीतलं नावाजलेलं नाव आहे रूशी कपूर. हसता खेळता तर कधी विनोदी तर कधी रागीट स्वभाव प्रेक्षकांपुढे दर्शवणारा ऋषी कपूर कायम लोकांच्या लक्षात असणारा एक चेहरा. ऋषी कपूरला जाऊन दोन वर्ष झालीत. तरी त्याच्या अभिनयातून तो आजही लोकांमधे जीवंत आहे.नुकतंच लग्न झालेल्या रणबीर आलियाच्या लग्नात त्यांच्या घरच्यांना तसेच अनेक चाहत्यांना रूशी कपूरची आठवण झाली होती. रूशी कपूरच्या आठवणीत नीतू कपूरने केलेल्या भाऊक पोस्टला अनेकांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
"ऋषीजींना जाऊन दोन वर्ष झालीत. ४५ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर जीवनसाथीची साथ सुटणे फार दु:खदायी होते.त्यावेळी स्वत:ला सावरत कायम टीव्ही आणि चित्रपटांमधे गुंतवून ठेवणे हा एकच पर्याय होता. ऋषी कायम सगळ्यांच्या आठवणीत राहिल", असे कॅप्शन देत नीतू कपूरने तीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय.(Neetu Kapoor) या व्हिडिओमधे एक महिला ऋषी कपूरच्या आठवणीत एक गाणं म्हणते. "हे गाणं ऐकून नीतूला रडायला येतं.रोज कोणी तरी मला ऋषीची आठवण काढून देत असतं,एवढ्या ऋषीच्या आठवणी आहेत". असे नीतू कपूर 'शो' दरम्यान म्हणाली.
१९७३ पासून ते २००० पर्यंत ऋषी कपूरने ९२ 'रोमँटिक चित्रपट' लीड केले आहेत.चित्रपटातील त्याच्या अभिनयाने कोणालाही भूरळ पडावी असा त्याचा अभिनय असायचा.रिद्धामा कपूरनेही सोशल मीडियावर 'पापा' असे कॅप्शन टाकत ऋषीकपूरसोबतचा बालपणीचा एक फोटो शेअर केलाय.
Web Title: Actress Neetu Kapoor Cried On Stageremembering Rishi Kapoor On His Second Death
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..