नोराचे 'हे' ठुमके पाहुन 'कमरिया', 'दिलबर' सारखी गाणी देखील विसरुन जाल.. व्हिडिओ व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

लॉकडाऊनच्या काळातही आपल्या चाहत्यांचं मनोरंजन व्हावं म्हणून नोरा पुरेपूर काळजी घेत आहे. घरच्या घरीच नोरा नृत्य सादर करत तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. नोराचा यातीलच एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड गाजतोय.

मुंबई- 'दिलबर दिलबर' म्हणत अख्ख्या तरुणाईला आपल्या तालावर नाचायला लावणारी अभिनेत्री नोरा फतेही. नोराचे केवळ देशातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत आणि तिने लगावलेल्या ठुमक्यावर ते बेहद्द खुश आहेत.  या कॅनेडीयन डान्सर कम अभिनेत्रीने आपल्या दमदार परफाॅर्मन्सने लाखो तरुणांना अक्षरशः वेड लावले आहे. तिच्या डान्सिंग कौशल्याचे लाखो चाहते आहेत.

हे ही वाचा: डेली सोप- दुरदर्शन मालिका आणि स्मरणरंजन

बाटला हाऊस, मरजावां, सत्यमेव जयते यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये तिच्यावर खास गाणी चित्रीत करण्यात आली होती. नोराचे रुपेरी पडद्यावरील ठुमके पाहून थिएटरमधलं पब्लिकही थक्क झालं होतं. तिचा डान्स सुरू होताच थिएटरमध्ये एकच टाळ्या आणि शिट्यांचा आवाज घुमतो. तिच्या गाण्यावर थिएटरमधील पब्लिकही थिरकायला लागतं. सध्या स्पेशल डान्ससाठी तिला भलताच डिमांड आहे. केवळ हिंदी चित्रपटसृष्टीतच नाही तर साऊथमधील पब्लिकलाही तिच्या डान्स कौशल्याने वेड केलं आहे. नोराचे एखादे स्पेशल साँग आपल्या चित्रपटात असावे याकरिता निर्माते व दिग्दर्शकही प्रयत्नशील असतात. नुकतीच ती स्ट्रीट डान्सर 3डी चित्रपटात तर डान्ससह उत्तम अभिनय करतानाही दिसली. आता लॉकडाऊनच्या काळातही आपल्या चाहत्यांचं मनोरंजन व्हावं म्हणून ती पुरेपूर काळजी घेत आहे. 

घरच्या घरीच नोरा नृत्य सादर करत तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. नोराचा यातीलच एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड गाजतोय. या व्हिडिओमध्ये नोरा डान्ससह वर्कआऊट देखील करताना दिसत आहे. घरातच असताना फिट ऍण्ड फाईन कसं राहायचं हे सतत ती तिच्या व्हिडिओमधून प्रेक्षकांना सांगत आहे. अगदी काही तासांमध्येच तिच्या व्हिडिओला हजारो व्ह्युज मिळाले आहेत. लॉकडाऊनच्या काळातही आपल्यामध्ये असणारं नृत्य कौशल्य ती आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवत आहे.

actress nora fatehi dance video goes viral on social media  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress nora fatehi dance video goes viral on social media