Parineeti Chopra: आम आदमी पार्टीच्या 'या' नेत्याला डेट करतेय परिणीती चोप्रा? फोटो समोर आले

Latest Marathi News: आम आदमी पार्टीचे प्रसिद्ध नेते राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा एका रेस्टॉरंटबाहेर स्पॉट झाले आहेत.
parineeti chopra and raghav chadha News
parineeti chopra and raghav chadha NewsSakal

Parineeti Chopra News: राजकारण आणि बॉलीवूडचे नाते काही नवीन नाही. राजकारण आणि बॉलीवूडच्या कॉरिडॉरमधून अशी एक बातमी समोर आली आहे, जी जाणून घेतल्यानंतर तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काल संध्याकाळी माया नगरी मुंबईत आम आदमी पार्टीचे प्रसिद्ध नेते आणि पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांच्यासोबत दिसली.(Latest Marathi News)

दोघेही कॅमेऱ्यात दिसल्यानंतर लोकांनी अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. दोघेही एका रेस्टॉरंटच्या बाहेर दिसले. जिथे दोघेही मस्त लूकमध्ये एकत्र दिसत आहेत.

काल संध्याकाळी दोघेही पांढऱ्या शर्टमध्ये दिसले होते. आता चर्चा सुरू आहे की परिणीती आणि राघव एकमेकांना डेट करत आहेत का?(Entertainment News in Marathi)

parineeti chopra and raghav chadha News
Shark Tank India 2 : शार्क टँक इंडियाचा अनुमप मित्तल रुग्णालयात! झालं तरी काय?

यावर काहीही बोलणे खूप घाईचे आहे, परंतु एक गोष्ट जाणून घेणे महत्वाचे आहे की चालू वर्षाच्या जानेवारी महिन्यात परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांना 'इंडिया यूके आउटस्टँडिंग अचिव्हर ऑनर्स' या सन्मानाने एकत्रितपणे सन्मानित करण्यात आले होते. भारतात पहिल्यांदाच एखाद्याला हा सन्मान मिळाला आहे.

नॅशनल इंडियन स्टुडंट्स अँड अॅल्युमनी युनियन (NISAU) यांनी ब्रिटीश कौन्सिल इन इंडिया आणि यूकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार विभाग (DIT) यांच्या संयुक्त विद्यमाने हा सन्मान आयोजित केला होता.

ब्रिटीश विद्यापीठात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून हा सोहळा पार पडला. विशेष म्हणजे भारतीय विद्यार्थ्यांचे यश लक्षात घेऊन येथे हा उत्सव साजरा करण्यात आला.

15 वर्षांपूर्वी परिणीती चोप्रा यूकेच्या मँचेस्टर स्कूलची विद्यार्थिनी होती. राघव चढ्ढा यांच्या शिक्षणाविषयी बोलताना, त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे.

परिणीती आणि राघव दोघेही अभ्यासात हुशार होते आणि त्यांच्या वर्गात टॉपरही होते. परिणीती सिंगल आहे आणि राघव यांनीही वयाच्या ३४ व्या वर्षापर्यंत लग्न केलेले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com