शार्क टँक इंडियाचा अनुमप मित्तल रुग्णालयात! झालं तरी काय?| Shark Tank India 2 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anupam Mittal Shark Tank India 2 Hospitalized photo

Shark Tank India 2 : शार्क टँक इंडियाचा अनुमप मित्तल रुग्णालयात! झालं तरी काय?

Shark Tank India 2 Anupam Mittal Hospitalized : टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये शार्क टँक इंडियानं मोठी प्रसिद्धी मिळवल्याचे दिसून आले. देशातील नवउद्योजकांच्या कल्पनांना संधी देण्याचे काम या रियॅलिटी शो ने केल्याचे दिसून आले. या शो मध्ये चर्चा रंगली ती त्यामध्ये सहभागी झालेल्या जजेसची.

आता शार्क टँकमधील प्रसिद्ध जज अनुपम मित्तल याच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यानं त्याचा रुग्णालयातील फोटो शेयर केला आहे. त्यामुळे चाहत्यांना देखील धक्का बसला आहे. आपल्या हटक्या प्रतिक्रियांसाठी आणि परखड वक्तव्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अनुपमला हात मोडल्यामुळे रुग्णालयात दाखल व्हावं लागलं आहे. ५१ वर्षाच्या अनुमपच्या त्या फोटोवर नेटकऱ्यांनी त्याला वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Also Read - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

अनुपम हा शार्क टँक इंडियामधून मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला. शादी डॉट कॉममुळे सोशल मीडियावर नेहमीच प्रसिद्ध असणाऱ्या अनुमपच्या व्हायरल व्हिडिओला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो. तो त्याच्या फिटनेससाठी देखील चाहत्यांचा चर्चेचा विषय राहिला आहे. आता त्याच्या रुग्णालयात दाखल झालेल्या फोटोनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

शार्क टँक इंडियाच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. यातच अनुपमच्या जखमी झाल्याच्या बातमीनं चाहत्यांना धक्का बसला आहे. अनुपमच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यानं फोटो शेयर करत चाहत्यांना याविषयी माहिती दिली आहे.

अनुपमनं इंस्टावर फोटो शेयर केला असून त्याला त्याच्या चाहत्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यानं तो फोटो शेयर करताना लिहिलं आहे की, मंजिल जब दूर हो जाए तो मेहनत से फाईट करो....त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटसचा वर्षाव केला आहे.