परिणीती चोप्राच्या ‘द गर्ल ऑन ट्रेन’ च्या टीझरचा धुमाकुळ

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 13 January 2021

परिणीतीचा नुकताच ‘द गर्ल ऑन ट्रेन’ चित्रपटाचा टीझर प्रसिध्द झाला आहे. अल्पावधीतच त्याला हजारो लाईक्स मिळाले आहेत.

मुंबई - केवळ प्रियंका चोप्रा हिची बहिण अशी परिणीती चोप्राची ओळख नाही. ती एक गुणी अभिनेत्री हे तिनं तिच्या इश्कजादे सारख्या इतर अनेक चित्रपटांमधून सिध्द केले आहे. ती सध्या सायना नेहवालच्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपट निर्मितीमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. त्याविषयी तिनं सोशल मीडियावर काही पोस्टही शेयर केल्या होत्या.

परिणीतीचा नुकताच ‘द गर्ल ऑन ट्रेन’ चित्रपटाचा टीझर प्रसिध्द झाला आहे. अल्पावधीतच त्याला हजारो लाईक्स मिळाले आहेत. तसेच परिणीतीच्या चाहत्यांनीही तिच्या अभिनयाचे कौतूक करुन तिचा उत्साह वाढविला आहे. आगामी काळात परिणीता तिचा नवा चित्रपट घेऊन येत आहे. तो चित्रपट ‘द गर्ल ऑन ट्रेन’ हा आहे. त्यामाध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

8 मे 2020 रोजी ‘द गर्ल ऑन ट्रेन’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार होता. आता हा चित्रपट 26 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात परिणीतीच्या भूतकाळाचा भविष्यावर परिणाम होणार असल्याचे दाखवण्यात येणार आहे. गेल्या वर्षी परिणीतीच्या ‘द गर्ल ऑन ट्रेन’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले होते. तेव्हा पाहून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. आता चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या 20 सेकंदाच्या टीझरमध्ये परिणीतीचा अभिनय जबरदस्त आहे.

'मला आई व्हायचं नव्हतं, मुलंही नको होती'

टीझर प्रदर्शित होताच परिणीतीने चित्रपटातील एक पोस्टर देखील शेअर केले आहे. या चित्रपटात परिणीतीसोबत अदिती हैदरी, क्रिती कुल्हारी आणि अविनाष तिवारी देखील भूमिका साकारणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress Parineeti Chopra the girl on the train movie trailer