'मला आई व्हायचं नव्हतं, मुलंही नको होती'

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 13 January 2021

90 च्या दशकात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून आयशा झुल्का चर्चेत होती. ती एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील अनेक गोष्टींना उजाळा दिला आहे.

मुंबई - बॉलीवूडमध्ये दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री म्हणून आयशा झुल्काचे नाव घेता येईल. वो जिता वही सिकंदर चित्रपटातून ती सर्वांच्या कौतूकाचा विषय ठरली होती. त्यानंतर अनेक चित्रपटांनी आयशाला नवा चेहरा दिला. प्रसिध्दी दिली. लाईम लाईटच्या दुनियेत स्वताचे नाव रजतपटावर तयार केले. या अभिनेत्रीनं आपल्याला कोणत्या मानसिकेतून आणि संघर्षातून जावे लागले हे सांगितले आहे.

90 च्या दशकात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून आयशा झुल्का चर्चेत होती. ती एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील अनेक गोष्टींना उजाळा दिला आहे. तसेच बॉलीवूडमध्ये सामना कराव्या लागणा-या समस्यांना शब्दरुप दिले आहे. आजवर आपण आई का झालो नाही याचेही कारण तिनं यावेळी सांगितले. तिचं ते अनुभव कथन ऐकणं तिला सामो-या जावे लागलेल्या प्रसंगांची आठवण करुन देणारे होते. 2018 मध्ये आयशा एका चित्रपटात दिसून आली होती. त्यानंतर तिनं ब्रेक घेतला. 80 आणि 90 चे दशक गाजवण्यात आयशाचे नाव घ्यावे लागेल. हिम्मतवाला, जो जीता वही सिकंदर, चाची 420 यासारखे ब्लॉकबस्टर चित्रपटात तिनं काम केले होते. त्यानंतर ती लाईमलाईट पासून दूर गेली.

आयशानं आपलं फिल्मी करिअर आणि वैवाहिक आयुष्य याविषयी काही गोष्टी सांगितल्या. ती म्हणाली, मी केवळ तारखांचे वेळापत्रक न जमल्यामुळे अनेक चित्रपट सोडले. त्यात मणिरत्नम यांचा रोजाही होता. आणि यासगळ्याचा मला आता पश्चाताप होत आहे. इतकेच नव्हे तर मी रामा नायडू यांचा प्रेम कैदीही रिजेक्ट केला होता. याचे कारण म्हणजे त्या चित्रपटात मला बिकीनी घालण्याची सक्ती करण्यात आली होती. ज्य़ावेळी आयशाला तिच्या आई न होण्याबद्दल प्रश्न विचारला गेला तेव्हा ती म्हणाली, मला मुलं नको होती. मी पहिल्यापासून माझ्या कामाला प्राधान्यक्रम दिला आहे. मुलाबाळांमध्ये मला अडकायचे नव्हते. त्यावेळी माझ्यासाठी वेळ आणि कामाप्रती उर्जा जास्त महत्वाची होती. आता ती मी समाजासाठी वापरत आहे. 

'पीयुष मिश्रांमुळे सलमान खान झाला स्टार'

90 च्या दशकातील अभिनेत्रीनं सांगितले की, मी त्यावेळी जे कुठले निर्णय घेतले त्याचा मला कुठला त्रास झाला नाही. यासगळ्यात मला माझ्या परिवारानं सांभाळून घेतलं. माझा नवरा समीर यानेही कधीही माझ्यावर दबाब आणला नाही. 2003 मध्ये आयशानं समीर वाशी याच्याशी लग्नं केलं होतं. 2018 मध्ये ती जिनियस नावाच्या एका चित्रपटात काम केलं. त्यापूर्वी 2010 मध्ये आलेल्या 'अदा...ए वे ऑफ लाइफ' चित्रपटातही आयशानं भूमिका केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 90s Actress Ayesha Jhulka Says reasons for not having child rejected film due to bikini scene