'पहिली लग्नाची तारीख सांग नाहीतर...': पायलची बॉयफ्रेंडला धमकी|Actress Payal Rohatagi share post boyfriend | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Payal Rohatgi

'पहिली लग्नाची तारीख सांग नाहीतर...': पायलची बॉयफ्रेंडला धमकी

Tv Entertainment News: टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये आपल्या हटक्या अंदाजानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणून पायल रोहतगीचे नाव घेतला येईल. (Television industry) बिग बॉसच्या शो मध्ये देखील ती सहभागी झाली होती. (Bigg Boss News) त्यानंतर तिनं कंगनाच्या लॉक अप नावाच्या शो मध्ये प्रेक्षकांची मनं जिंकुन घेतली होती. आता पायल एका वेगळ्या कारणसाठी चर्चेत आली आहे. तिनं तिच्या बॉयफ्रेंडला धमकी दिली आहे. त्यामुळे तिला ट्रोल करण्यात आले आहे. नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे पायलचा राग अनावर झाला? कंगनाच्या लॉक अप शो मधून पायलच्या वाट्याला मोठी लोकप्रियता आली. तिनं अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. पायलनं तिच्या बॉयफ्रेंडला लवकरात लवकर लग्न करण्यास सांगितले आहे. अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील असे सांगितले आहे.

लॉक अपमधून बाहेर पडल्यानंतर पायलनं केलेला धक्कादायक खुलासा चाहत्यांना चक्रावून टाकणारा आहे. पायल ही तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिचा चाहतावर्गही मोठा आहे. पायलनं तिच्या बॉयफ्रेंडला संग्रामला धमकी दिली आहे. ती सोशल मीडियावर व्हायरलही झाली आहे. यापूर्वी देखील पायलनं वेगवेगळ्या प्रकारे वक्तव्य करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. संग्रामनं जर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील असं पायलनं म्हटलं आहे.

हेही वाचा: Video : लेबर कॉलनीतील 300 पेक्षा जास्त घरे जमीनदोस्त करण्यात सुरुवात

पायलनं गंभीर होत ही धमकी दिलेली नाही. तर तिनं त्याची गंमत केली आहे. संग्रामला पायलनं सांगितलं की, गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या लग्नाचा प्रश्न हा प्रलंबित आहे. त्यामुळे येत्या काळात लग्न करण्यासंबंधी तू घाईनं विचार करायला पाहिजे. तसं झालं नाहीतर मी तुझा मोबाईल नंबर सोशल मीडियावर शेयर करणार असल्याची धमकी पायलनं दिली होती. त्यावरुन तिला ट्रोलही करण्यात आले होते. आणखी एक विशेष बातमी सांगायची झाल्यास, पायलनं संग्रामला लॉक अपमध्ये येवून आपल्याला प्रपोझ करण्याविषयी सांगितलं होतं. त्यानं ते केलंही होतं.

Web Title: Actress Payal Rohatgi Share Post Boyfriend Now Take Decision To Marry

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top