
Vaibhav tatwawadi birthday: पूजा सावंतची पोस्ट बघाच, याला शुभेच्छा म्हणायच की?
Vaibhav tatwawadi birthday: 'बाजीराव मस्तानी', 'कॉफी आणि बरच काही', 'पॉन्डीचेरी' आणि अशा अनेक चित्रपट, मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या अभिनेता वैभव तत्ववादीचा आज वाढदिवस. वैभव आज त्याचा ३४ वा वाढदिवस साजरा करतो आहे. मराठी त्याचप्रमाणे हिंदी सिनेमा, वेब सीरिज यामध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या वैभवचे लाखो चाहते आहेत. पण आज त्याच्या एका खास मैत्रिणीने त्याच्यासाठी एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टची सध्या बरीच चर्चा आहे.
वैभव आणि अभिनेत्री पूजा सावंत (pooja sawant) यांची मैत्री संपूर्ण मनोरंजन विश्वाला माहीत आहे. मध्यंतरी त्यांच्या अफेअरच्याही चर्चा होत्या. पण त्यांच्यातील मैत्री खूप घट्ट असल्याचे त्यांनी सांगितले होते. ते आज पूजाच्या पोस्ट वरुन अधिक स्पष्ट दिसते. आज वैभवच्या वाढदिवसानिमित्त तिने एक खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
पूजाने वैभव सोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. सोबत एक खास कॅप्शनही दिले आहे. ती म्हणते, 'हॅप्पी बर्थ डे तत्ववादी.. तू असा मित्र आहेस की जो अत्यंत त्रासदायक आहे. पण केवळ तू त्रासदायक नाही तर मरेपर्यंत हसवणारा आहेस,' असे तिने लिहिले आहे. तिच्या या पोस्टची सध्या बरीच चर्चा आहे.
पूजा ही मराठीतील नावाजलेली अभिनेत्री आहे. पूजाने अनेक हीट सिनेमे दिले आहेत. नुकताच तिचा 'दगडी चाळ 2' चं चित्रपट येऊन गेला. तर वैभव सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'निर्मल पाठक की घर वापसी' या त्याच्या सीरिजमुळे चर्चेत आहे.