PHOTO VIRAL: आता काय बोलायचं, ह्रतिकनं सांभाळली प्रिती झिंटाची मुलं! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Preity Zinta thanks Hrithik Roshan to help her twins in long flight

PHOTO VIRAL: आता काय बोलायचं, ह्रतिकनं सांभाळली प्रिती झिंटाची मुलं!

अभिनेत्री प्रिती झिंटाने ह्रतिकसोबतचा एक फोटो शेअर केलाय.या फोटोची सोशल मीडियावर खूप चर्चा चाललेली दिसते.बॉलीवूड अभिनेत्री प्रिती झिंटा ही दोन मुलांची आई आहे.तीने नुकताच तीच्या दोन चिमुकल्यांसह परदेशातून भारतातपर्यंतचा विमानाने प्रवास केलाय.या लांब प्रवासात या दोन चिमुकल्यांना एकट्याने सांभाळणे तीच्या साठी कठीण होते.सुदैवाने या लांबच्या प्रवासात तीला तीच्या मुलांना सांभाळण्यास ह्रतिकची मदत झाली.

हेही वाचा: Happy Birthday Preity Zinta : चॉकलेटच्या जाहिरातीत झळकून बॉलीवूडमध्ये ठसा उमटवणारी अभिनेत्री

प्रिती झिंटाचे तीच्या ट्वीन्स बाळांवर किती प्रेम ते तीच्या सोशल मीडियावरून नेटकऱ्यांना तीच्या इन्स्टाग्रामच्या पोस्टच्या माध्यमातून नेहमीच बघायला मिळतं.आपल्या अभिनयाने ९० च्या दशकात प्रितीने बॉलीवू़ड गाजवले आहे.सध्या ती तीच्या ट्वीन्स बाळांसह खूश असून त्यांच्यासोबत वेळ घालवण्यास जास्त प्राधान्य देते.'जय' आणि 'जीया' अशी तीच्या जुळ्या मुलांची नावं आहेत.प्रिती तीच्या नवऱ्यासह लॉस एंजेलिसला असते.लॉस एंजेलिसहून नुकताच तीने तीच्या जुळ्या मुलांसह भारतापर्यंतच्या लांब पल्ल्याचा प्रवास केलाय.

हेही वाचा: Hrithik Roshan: विक्रम वेधाचा कडक लूक गर्लफ्रेंडची ढिंनच्यॅक कमेंट

बॉलीवूड अभिनेता ह्रतिक रोशन त्याच्या दोन मुलांसह विमानतळावर लॉस एंजेलिस साठीची फ्लाईट पकडताना दिसला होता.ज्या वेळी अभिनेत्री प्रिती झिंटा लॉस एंजेलिसहून भारतासाठी विमान प्रवास करणार होती त्यावेळी ह्रतिक रोशन भारतात परत येत होता.त्यामुळे ह्रतिकची तीला फार मदत झाली.तीने तीच्या इन्टाग्राम अकाऊंटला त्याचे आभार मानले आहे.त्याला खरा मित्र म्हणवत तीने तीच्या इंस्टाग्रामला लिहिले आहे की,'आयुष्यात अनेकजण येतात आणि जातात,मात्र खरे मित्र त्यांची छाप ह्रदयात कायमची सोडून जातात.या लांबच्या प्रवासात जीया आणि जयला सांभाळण्यास तुझी खूप मदत झाली.तुझे खूप खूप आभार.'

ह्रतिकसोबतच्या या फोटोची मात्र सोशल मीडियावर फार चर्चा चाललेली दिसते.एका चाहत्याने तर कमेंटमधे 'कोई मिल गया' हे गाणं आठवतय असं लिहीलय.

Web Title: Actress Preety Zinta Thanks To Hritik Roshan For Helping Her In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top