Happy Birthday Preity Zinta : चॉकलेटच्या जाहिरातीत झळकून बॉलीवूडमध्ये ठसा उमटवणारी अभिनेत्री

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 31 January 2021

कॅालेजमध्ये असतानाच प्रितीला कला आणि साहित्याची आवड निर्माण झाली. 

Happy Birthday Preity Zinta: बॅालिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री प्रिती झिंटाने आपल्या अभिनयाने आणि अदांकारीन नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. अनेक चित्रपटांधून तिने  प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आज तिचा 46 वा वाढदिवस. वाढदिवसाच्या दिवशी प्रितीवर होणारा शुभेच्छांचा वर्षाव तिची जादू आजही कामय असल्याचे दाखवून देणारा असाच आहे.  

प्रितीचा जन्म 31 जानेवारी 1975 रोजी झाला. तिचे कुटुंब हिमाचलप्रदेशमध्ये येथे राहत होते. तिच्या वडिलांच नाव दुर्गानंद झिंटा होते. ते भारतीय लष्करात अधिकारी पदावर कार्यरत होते. एका कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला तेव्हा प्रिती अवघ्या  13 वर्षांची होती. त्या कार अपघातामुळे प्रितीची आई नीलप्रभा या दोन वर्ष कोमामध्ये होत्या.  

कंगणानं केलं नथुराम यांचं समर्थन म्हणे, 'आपल्यापासून सत्य लपवलं'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

या अपघातामुळे प्रिती लहान वयातच खूप जबाबदाऱ्या उचलव्या लागल्या. प्रितीला दोन भाऊ आहेत. प्रितीचे शिक्षण शिमला येथेच झाले. कॅालेजमध्ये असतानाच प्रितीला कला आणि साहित्याची आवड निर्माण झाली. तेव्हा तिने शेक्सपिअरच्या अनेक नाटकांचे वाचन केले. कॉलेजपूर्ण केल्यानंतर प्रितीने काही दिवस मॉडेलिंग क्षेत्रात काम केले. मॉडेलिंग क्षेत्रात काम करत असतानाच तिला एका चॉकलेटच्या जाहिरातीत काम करायची संधी मिळाली. या जाहिरातीनंतर तिने अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली.  

मौनीचे स्वीमिंग पूलमधले फोटो पाहिले? नजर हटणार नाही

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

1997 साली प्रिती आपल्या मित्रा सोबत ऑडिशनला गेली होती तेव्हा प्रसिद्ध दिग्दर्शक  शेखर कपूर यांनी तिला पहिले. 'दिल से' या चित्रपटातून प्रितीने चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर 'चोरी चोरी चुपके चुपके', 'दिल चाहता है', 'कल हो ना हो' 'वीर झारा', 'कभी अलविदा ना कहना' या प्रसिद्ध चित्रपटांमधून प्रितीने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण  केले. अभिनयाबरोबरच प्रितीला क्रिकेटची ही आवड आहे किंग्स इलेव्हन पंजाब ही आयपीएल टीम प्रितीची आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: happy birthday preity zinta know these important and unknown facts bollywood actresses