वडिलांची लिटील गर्ल प्रियंका चोप्रा आठवणीने भावुक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

नुकताच वडिलांच्या वाढदिवशी प्रियंकाने त्यांना समर्पित असा एका व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. ज्याद्वारे प्रियंकाने वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनस यांच्यातील नात्याने सध्या प्रियंका चर्चेत आली आहे. आता तर अधिकृतरित्या हे नाते पक्के झाले आहे. प्रियंका या नात्याने सध्या खुश आहे. पण या आनंदातही तिच्या बाबांच्या आठवणीने ती गहिवरुन गेली आहे. 

'डॅडीज् लिटील गर्ल' असा टॅटू देसी गर्लने आपल्या हातावर गोंगवून घेतला, त्यानंतर या टॅटूचीही बरीच चर्चा झाली. कित्येक मुलाखतीत प्रियंकाने आपल्या वडिलांबद्दल भरभरुन बोलल्याचे दिसून येईल. सोशल मिडीयावरही वडिलांबरोबरचे अनेक फोटो शेअर करत प्रियंका त्यांची कमतरता नेहमीच जाणवत राहील असे सांगते.
 

नुकताच वडिलांच्या वाढदिवशी प्रियंकाने त्यांना समर्पित असा एका व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. ज्याद्वारे प्रियंकाने वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

काही वर्षांपूर्वी प्रियंकाचे वडिल डॉ. अशोक चोप्रा यांचे निधन झाले होते. वडिलांच्या आठवणीत शेअर केलेल्या व्हिडीओ ला कॅप्शन देत प्रियंका म्हणते, 'बाबा. तुमची खूप आठवण येत आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा. नेहमीच आणि कायम.'     
 

 

Dad. U r so missed. Happy birthday. Always and forever.

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Priyanka Chopra Shared A Emotional Video On Her Fathers Birthday