esakal | कोरोनाचा खोटा रिपोर्ट शेअर करणं बंद करा; सेलिब्रेटींवर राखी भडकली 
sakal

बोलून बातमी शोधा

actress rakhi sawant angry on careless people who show a fake covid 19 report at the airport

गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं बॉलीवूडमधील सेलिब्रेटींना भंडावून सोडले आहे.

कोरोनाचा खोटा रिपोर्ट शेअर करणं बंद करा; सेलिब्रेटींवर राखी भडकली 

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनानं राज्याला ग्रासलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. आता तर परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे पुन्हा एकदा गंभीर परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या प्रशासनापुढे डोकेदुखी ठरत आहे. अशावेळी बॉलीवूडमधील वाढता कोरोना चिंतेचा विषय आहे. त्याविषयाला राखी सावंतने टीकात्मक प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे एक वेगळा प्रश्न निर्माण झाला आहे. आतापर्यत ज्या कलाकारांनी आपल्याला कोविड झाला आहे असे सांगितलं आहे तो खरा की खोटा असा सूर राखीच्या प्रतिक्रियेतून अप्रत्यक्षपणे काढला जात आहे. राखीनं खोटा कोरोना रिपोर्ट बनविणा-यांवर टीका केली आहे. अनेकजण खोटा कोरोना रिपोर्ट बनवत असल्याचे तिनं म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं बॉलीवूडमधील सेलिब्रेटींना भंडावून सोडले आहे. त्यामुळे अनेक निर्माते आणि दिग्दर्शक यांना आपले प्रोजेक्ट बंद करावे लागले आहेत. ब-याचशा मालिका आणि चित्रपटांचे चित्रिकरण पुढे ढकलण्यात आले आहे. आगामी काळात मोठ्या प्रमाणावर बॉलीवूडमधील बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार होते. आता त्यांच्या प्रदर्शनावर लॉकडाऊनमुळे नामुष्की ओढावली आहे. मोठमोठे कलाकारांना कोरोना झाला आहे. त्यांनी त्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. दरम्यानच्या काळात आपल्या संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. या परिस्थितीवर अभिनेत्री आणि टिव्ही स्टार राखी सावंतनं टिप्पणी केली आहे.

बॉलीवूडमधील कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर कलाकारांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे राखीनं त्यावर आपला राग व्यक्त केला आहे. तिनं अनेकजण कोविड 19 चा खोटा रिपोर्ट बनवत असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आपल्य़ाला वाईट असल्याची खंत तिनं व्यक्त केली आहे. राखीनं जी प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे ती चर्चेत आली आहे. राखीनं माध्यमांशी बोलताना सांगितले की, कोरोनाचा वाढता कहर सर्वांसाठी धोकादायक आहे. परिस्थिती बदलत आहे. सध्या कोरोनाचा रिपोर्ट ज्यापध्दतीनं तयार केला जात आहे त्याबद्दल शंका वाटते. आजकाल बहुतांशी लोकं खोटा रिपोर्ट तयार करत आहे याचे वाईट वाटते.

हेही वाचा : अजय देवगणसोबत अफेअरच्या चर्चांवर अखेर महिमाने सोडलं मौन; म्हणाली..

कोविडच्या नावानं खोटा रिपोर्ट तयार करणं बंद केलं तर कोरोना संपून जाईल असे वाटते. खोटं कोरोनाचा सर्टिफिकेट तयार केले जात आहे. काहींना टेस्टसाठी 600, 800 आणि 1200 रुपये द्यायचे नाहीत. त्यांना सगळं खोटं रिपोर्ट तयार करुन तो सोशल मीडियावर शेअर करायचा आहे. असेही राखीनं सांगितलं.  
 

loading image