esakal | अजय देवगणसोबत अफेअरच्या चर्चांवर अखेर महिमाने सोडलं मौन; म्हणाली..
sakal

बोलून बातमी शोधा

ajay devgn

काजोलसोबत अजयच्या लग्नानंतर महिमाशी त्याचं अफेअर असल्याच्या चर्चांना आलं होतं उधाण

अजय देवगणसोबत अफेअरच्या चर्चांवर अखेर महिमाने सोडलं मौन; म्हणाली..

sakal_logo
By
स्वाती वेमूल

नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री महिमा चौधरी तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई यांनी महिमाला बॉलिवूडमध्ये पहिली संधी दिली. त्यानंतर तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये नामवंत कलाकारांसोबत काम केलं. मात्र हळूहळू तिचं स्टारडम कमी झालं आणि ती बॉलिवूडपासून दूर गेली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत महिमा तिच्या अपघाताबद्दल आणि खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. 

अजय देवगणसोबत अफेअरच्या चर्चा
अजय देवगणसोबत अफेअरच्या चर्चांवर महिमा पहिल्यांदाच या मुलाखतीत व्यक्त झाली. अजयच्या 'दिल क्या करे' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान महिमाचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात महिमाच्या चेहऱ्याला जबर दुखापत झाली होती. अफेअरच्या चर्चा कशा सुरू झाल्या हे सांगताना ती म्हणाली, "त्या घटनेनंतर शूटिंगदरम्यान दिग्दर्शकाने माझ्या चेहऱ्याजवळून सीन घेण्याचा प्रयत्न केला. अजूनही चेहऱ्यावर डाग असल्याने मी त्यांना तसं करण्यास नकार दिला. अखेर अजयने मध्यस्ती करत त्यांना माझी बाजू समजावून सांगितली. मात्र नंतर त्याच दिग्दर्शकाने अजय आणि माझं अफेअर सुरू असल्याची अफवा पसरवली होती. तेव्हा तर अजयचं नुकतंच लग्न झालं होतं. या सर्व गोष्टींचा मला खूप त्रास झाला."

हेही वाचा : "अजय-काजोलने सर्वांपासून लपवलं"; महिमा चौधरीने सांगितल्या भीषण अपघाताच्या आठवणी 

दोन वेळा झाला गर्भपात
२००६ मध्ये महिमाने बॉबी मुखर्जीशी लग्नगाठ बांधली होती. मात्र या लग्नबंधनात ती फार खूश नव्हती. "पतीसोबत सतत वाद होत होते. दोन वेळा माझा गर्भपात झाला. लग्न झाल्यानंतर मी खूश नव्हते, म्हणून घटस्फोटाचा निर्णय घेतला", असं तिने सांगितलं. 

आईच्या आजारपणामुळे होती नैराश्यात
"माझ्या आईने आणि बहिणीने माझी खूप साथ दिली. माझ्या कठीण काळात आई माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी होती. मी कामात असताना ती माझ्या मुलीला सांभाळायची. पण जेव्हा मला समजलं की तिला पार्किंसन हा आजार असून ती फार काळ जगू शकणार नाही. तेव्हा मी मानसिकदृष्ट्या फार खचली होती", असं ती पुढे म्हणाली. 

loading image