अभिनेत्री राखी सावंतचे लग्न मोडलं?

वृत्तसंस्था
Friday, 23 August 2019

अभिनेत्री राखी सावंत हिने इन्स्टाग्रामवर तिच्या हनिमूनचे फोटो टाकल्यानंतर तिचा विवाह झाल्याचे वृत्त पसरले होते.

मुंबईः अभिनेत्री राखी सावंत हिने इन्स्टाग्रामवर तिच्या हनिमूनचे फोटो टाकल्यानंतर तिचा विवाह झाल्याचे वृत्त पसरले होते. मात्र, तिने पुन्हा एक छायाचित्र इन्स्टाग्रामवर अपलोड केले असून, त्यावरून तिचे लग्न मोडले का? अशा प्रतिक्रियांद्वारे नेटिझन्स विचारू लागले आहेत.

नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवण्यात आघाडीवर असलेल्या राखी सावंतने काही दिवसापूर्वी गुपचूप लग्न केले होते. अमेरिकेतील एक एनआरआय व्यक्ती तिचा पती आहे. राखीने तिच्या लग्नाबाबत गोपनियता बाळगली होती. मात्र, आता तिने इन्स्टाग्रामवर तिच्या हनिमूनचे फोटो शेअर केले होते. मात्र, आता लग्नाला एक महिना होण्यापूर्वीच तिचा घटस्फोट झाल्याची चर्चा नेटिझन्स करू लागले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

राखीने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने रडणाऱ्या मुलींची अॅनिमेटेड चित्रही शेअर केले आहे. तिच्या या पोस्टमधून तिला नेमके काय झाले आहे? हे समजत नाही. यामुळे नेटिझन्सनी तिला काही प्रश्न विचारले आहेत. यामध्ये 'तू घटस्फोट घेते आहेस का?', 'तुझं लग्न मोडलं का?' असे अनेक प्रश्न नेटिझन्स विचारत आहेत. मात्र, राखीने कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही.

दरम्यान, राखीने काही दिवसापूर्वी एका मुलाखतीमध्ये लंडनमध्ये स्थायिक असणाऱ्या रितेश नावाच्या उद्योगपतीशी लग्नगाठ बांधल्याचे सांगितलं होतं. लग्न झाल्याचं समजल्यानंतर मला काम मिळणार नाही या भीतीने मी ही गोष्ट लपवली होती, असेही तिने सांगितले होते. शिवाय, राखीच्या लव्ह स्टोरीची सुरुवात व्हॉट्सअप अॅपवरुन झाल्याचे तिचे सांगितले होते. ''माझा नवरा युकेला राहतो. माझा व्हिसा अजून मिळायचा आहे म्हणून मी इथे थांबलीये. व्हिसा आल्यावर मीसुद्धा तिथेच जाईन,'' असा खुलासा राखीने केला होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

एकटीच हनिमूनला चालले...
राखीने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, त्यामध्ये म्हटले आहे की, मी सध्या खूप खूष असून, पुढील आठवड्यात लंडनला चालले आहे. मी, हनीमूलला जात आहे. पण, यावेळी एकटीच जात आहे....

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress rakhi sawant getting divorced