esakal | रश्मी देसाईचा घटस्फोटाबाबत खुलासा, म्हणाली 'नंदीशची लक्षणं ठिक नव्हती'
sakal

बोलून बातमी शोधा

rashami

'बिग बॉस'मध्ये असताना तिच्या खाजगी आयुष्याबाबत झालेले खुलासे चाहत्यांना आश्चर्यचकित करणारे होते. रश्मी देसाईचं अभिनेता नंदीशसोबत लग्न झालं होतं मात्र लग्नाच्या काही वर्षातंच दोघांचा घटस्फोट झाला.

रश्मी देसाईचा घटस्फोटाबाबत खुलासा, म्हणाली 'नंदीशची लक्षणं ठिक नव्हती'

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि 'बिग बॉस' फेम रश्मी देसाई अनेकदा तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मिडियावर तिच्या चाहत्यांसोबत ती खास गोष्टी शेअर देखील करत असते. काही दिवसांपूर्वीच तिचं बोल्ड फोटोशूट चर्चेत होतं.. मात्र यावेळी ती कुठल्याही पोस्टमुळे नाही तर पुन्हा एकदा तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. 

हे ही वाचा: 'सुर्यवंशी' आणि '83' चं प्रदर्शन लांबणीवर; प्रेक्षकांची प्रतिक्षा कायम     

'बिग बॉस'मध्ये असताना तिच्या खाजगी आयुष्याबाबत झालेले खुलासे चाहत्यांना आश्चर्यचकित करणारे होते. रश्मी देसाईचं अभिनेता नंदीशसोबत लग्न झालं होतं मात्र लग्नाच्या काही वर्षातंच दोघांचा घटस्फोट झाला. रश्मीने ‘उतरन’ या मालिकेतील सहकलाकार नंदीशसोबत लग्न केलं होतं. परंतु त्यांचं नातं दिर्घ काळ टिकू शकलं नाही. लग्नानंतर तीन वर्षातच रश्मीने नंदीशला घटस्फोट दिला.

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत रश्मीने तिच्या घटस्फोटाबाबत खुलासा केला. तिने या घटस्फोटासाठी नंदीशचं वर्तन जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. रश्मी म्हणाली, ''नंदीश हा अत्यंत विचित्र प्रवृत्तीचा माणुस आहे. तो वरकरणी खूप शांत आणि सरळ मार्गाने चालणारा माणुस वाटतो. पण तो माझा गैरसमज होता. आमच्या नात्यात समानतेचा दर्जा नव्हता. तो अनेकदा मला अपमानास्पद वागणूक द्यायचा. मी हे नातं टिकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण हे नातं टिकू शकलं नाही. शेवटी सतत होणाऱ्या मतभेदांना वैतागून मी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. या घटस्फोटामुळे मी काही काळ नैराश्येत देखील होते.''

रश्मी देसाई एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. २००६ साली ‘रावण’ या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘परी हू मै’, ‘अधुरी कहानी हमारी’, ‘दिल से दिल तक’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तिने लहान-मोठ्या भूमिका साकारल्या. 'उतरन' या मालिकेमुळे तिला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली.

शिवाय ‘बिग बॉस’, ‘नच बलिये’, ‘झलक दिखलाजा’, ‘कॉमेडी नाईट्स’ यांसारख्या अनेक रिऍलिटी शोमध्येही तिची अभिनया व्यतिरिक्त वेगळी बाजु देखील पाहायला मिळाली. 'दिल से दिल तक' मध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाईच्या जोडीने प्रेक्षकांना वेड लावलं. मात्र बिग बॉसमध्ये त्यांच्या नात्यातील कटुता देखील प्रेक्षकांसमोर आली. 

 actress rashami desai on her divorce 

loading image