'सुर्यवंशी' आणि '83' चं प्रदर्शन लांबणीवर; प्रेक्षकांची प्रतिक्षा कायम

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 6 November 2020

गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमांच्या रिलीजविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. मात्र आता या दोन्ही सिनेमांच्या रिलीजसाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

मुंबई- अभिनेता अक्षय कुमार आणि रणवीर सिंह यांचा 'सुर्यवंशी' आणि '83' हे दोन्ही सिनेमे खूप चर्चेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमांच्या रिलीजविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. मात्र आता या दोन्ही सिनेमांच्या रिलीजसाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

हे ही वाचा: शाहरुखच्या बुर्ज खलिफा येथील फोटोमध्ये झळकलेली आणि सुहानासोबत नेहमी दिसणारी आलिया छिब्बा आहे तरी कोण?

रणवीर सिंहचा '83 हा सिनेमा ख्रिसमसमध्ये रिलीज होणार होता तर 'सुर्यवंशी' दिवाळीत रिलीज होणार होता. मात्र इतक्या कमी कालावधीत या सिनेमाचं प्रमोशन करणं शक्य नसल्याचं सांगत सिनेमाच्या रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचं म्हटलं जातंय. पुढील वर्षी म्हणजे २०२१ मध्ये हे दोन्ही सिनेमे रिलीज होणार असल्याचं रिलायन्स एन्टरटेन्मेंट ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिबाशीष सरकार यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. 

'सुर्यवंशी' आणि '83' हे दोन्ही सिनेमे आता रिलीज करणं शक्य नाही. लॉकडाऊन असल्यामुळे अजूनही काही ठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. त्यामुळे हे सिनेमे या वर्षी रिलीज न होता २०२१ मध्ये जानेवारी किंवा मार्चमध्ये रिलीज करण्याचा विचार सुरु असल्याचं शिबाशीष सरकार यांनी सांगितलं.

दरम्यान, 'सुर्यवंशी' या सिनेमाच्या माध्यमातून पोलिसांची शौर्यगाथा उलगडण्यात येणार आहे. यात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार असून रणवीर सिंह,अजय देवगण महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. तसंच '83' हा सिनेमा लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर २५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने जिंकलेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या विजयावर आधारित आहे. या सिनेमात अभिनेता रणवीर सिंह हा कपिल देव यांची भूमिका साकारतोय. त्यामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या या दोन्ही सिनेमांची प्रेक्षक आतुरतनेने वाट पाहत आहेत. 

ranveer singh 83 and akshay kumar sooryavanshi to now release in 2021  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ranveer singh 83 and akshay kumar sooryavanshi to now release in 2021