Animal: 'रणबीर एकमेव अभिनेता जो मला नेहमीच...' रश्मिकानं जे सांगितलं ते...|Actress Rashmika Mandana Comment on Ranbir Kapoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rashmika mandana news

Animal: 'रणबीर एकमेव अभिनेता जो मला नेहमीच...' रश्मिकानं जे सांगितलं ते...

Bollywood News: प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलियाचं (Alia Bhatt) काही दिवसांपूर्वी मोठ्या धुमधडाक्यात लग्न झालं. त्यानंतर ते त्यांच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्तही झाले. सध्या रणबीर हा त्याच्या अॅनिमल (Animal Movie) नावाच्या चित्रपटाच्या शुटिंगमध्य़े बिझी आहे. तो टॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत (Rashmika Mandana) शुट करतो आहे. आता तिनं रणबीरबाबत एक प्रतिक्रिया दिली आहे. ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

एप्रिलमध्ये मुंबईच्या आर के स्टुडिओमध्ये रणबीर आणि आलियाचं लग्न पार (Bollywood News) पडलं. या लग्नाला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. रणबीर हा आता मनालीत अॅनिमलच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. त्याच्या या (Entertainment News) चित्रपटामध्ये रश्मिका मुख्य अभिनेत्री आहे. पुष्पा नंतर रश्मिकाच्या वाट्याला मोठं यश आलं आहे. तिची ब्रँड व्हॅल्यु देखील वाढली आहे. (tollywood actress) टॉलीवूडच्या या चित्रपटानं गेल्या वर्षी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटली.

पुष्पाच्या प्रचंड यशानंतर रश्मिका अॅनिमलमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (pushpa movie) यापूर्वी देखील या रणबीर आणि रश्मिकाचे फोटोसोशल मीडियावर व्हायरल झाले होते. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित करत असलेल्या या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. संदीपनं यापूर्वी शाहिद आणि कियाराला घेऊन अर्जुन रेड्डी नावाचा चित्रपट केला होता. त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: Vikram Vedha: तीन वर्ष चाललेलं शुटींग संपलं, आता उत्सुकता प्रदर्शनाची!

रणबीर आणि रश्मिका हे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. त्यामुळे या दोन्ही सेलिब्रेटींच्या चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. अॅनिमल या चित्रपटाची निर्मिती भुषण कुमार आणि क्रिश्नन कुमार यांनी केली आहे. एका मुलाखतीमध्ये रश्मिकानं सांगितलं की, रणबीर हा खूप प्रेमळ अभिनेता आहे. मी जेव्हा त्याला पहिल्यांदा भेटली तेव्हा खूप नर्व्हस होते. पण त्याच्याशी बोलल्यानंतर खूप फ्रेश वाटले. तो खूपच प्रेमळ आहे. मला मॅडम म्हणून हाक मारतो. हे मला आवर्जुन सांगायचे आहे. बॉलीवूडमध्ये तो एकमेव असा अभिनेता आहे जो मला मॅडम म्हणून हाक मारतो. ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. असे रश्मिकानं सांगितलं आहे.

हेही वाचा: Vikram Movie: फक्त एक रुपया मानधन? अभिनेता सुर्यानं सांगितलं कारण...

Web Title: Actress Rashmika Mandana Comment On Ranbir Kapoor Animal Movie Set Manali

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top