Vikram Vedha: ह्रतिक - सैफच्या अभिनयाची जुगलबंदी! आता उत्सुकता प्रदर्शनाची |Bollywood Movies Vikram Vedha Hrithik Roshan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hrithik Roshan Vikram Vedha news

Vikram Vedha: ह्रतिक - सैफच्या अभिनयाची जुगलबंदी! आता उत्सुकता प्रदर्शनाची

Vikram Vedha Movie: साऊथच्या प्रेक्षकांना विक्रम वेधा नावाच्या चित्रपटाविषयी जास्त काही सांगण्याची गरज नाही. विजय सेतुपती आणि आर माधवन यांच्या (Tollywood movies) भूमिकेनं बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती. बॉलीवूडच्या चाहत्यांना देखील हा चित्रपट कमालीचा आवडला होता. बॉलीवूडमध्ये विक्रम वेधाचा रिमेक होणार अशी घोषणा झाली आणि चाहत्यांची उत्सुकता शिगेला (Bollywood Movies) पोहचली होती. बऱ्याच दिवसांपासून हिंदीतील विक्रम वेधा चित्रपटाचे वेध प्रेक्षकांना लागले आहेत. अखेर ती उत्सुकता संपली आहे. कोरोनाच्या काळात मोठा फटका या चित्रपटाला बसला होता. बॉलीवूडचा क्रिश (Hrithik Roshan) ह्रतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या त्यात महत्वाच्या भूमिका आहेत. पहिल्यांदाच हे दोन्ही अभिनेते एका चित्रपटातून एकत्रित दिसणार आहे.

हिंदीतील विक्रम वेधाविषयी असं सांगितलं जातं होतं की, हा चित्रपट गेल्या वर्षीच ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार. मात्र कोरोनामुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. आता हा चित्रपट यंदाच्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ह्रतिकनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेयर करुन त्याविषयी माहिती दिली आहे. बॉलीवूडचे लाखो चाहते विक्रम वेधाच्या हिंदी व्हर्जनचे गेल्या काही महिन्यांपासून वाट पाहत आहेत. त्यांत त्यांचे आवडते अभिनेते दमदार भूमिकेत असल्यानं त्यांच्याविषयी कमालीची उत्सुकता आहे. विक्रम वेधाच्या सेटवरील फोटो शेयर करुन ह्रतिकनं पोस्ट लिहिली आहे.

त्या पोस्टमध्ये तो म्हणतो, आज मी खूप आनंदी आहे. याचे कारण गेल्या तीन वर्षांपासून आम्ही ज्या प्रोजेक्टवर काम करत होतो तो पूर्ण झाला आहे. आम्ही सर्वजण त्यासाठी खूप उत्सुक होतो. टॉलीवूडमधील विक्रम वेधाच्या वाट्याला खूप यश आले. त्याची लोकप्रियताही मोठी असल्याचे दिसुन आले आहे. त्यामुळे आम्हाला पहिल्यापासून एकच गोष्ट सतावत होती ती म्हणजे विक्रम वेधाच्या हिंदी व्हर्जनला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल किंवा नाही? मात्र आता आम्ही निश्चिंत झालो आहोत.

हेही वाचा: Masoom Trailer: 'इन्सान की सच्चाई सीधी नही होती! गुंगवून टाकणारा 'मासूम'!

प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी आम्ही आता तयार झालो आहोत. विक्रम वेधाच्या टॉलीवूड व्हर्जनमध्ये वेधाची भूमिका विजय सेतुपती तर विक्रमची भूमिका आर माधवननं केली होती. हिंदी व्हर्जनमध्ये ती सैफ अली खाननं साकारली आहे.

हेही वाचा: Tollywood Vs Bollywood: 'आमचे चित्रपट प्रेक्षकांना आवडतातच!' कमल हासननं सांगितलं कारण...

Web Title: Bollywood Movies Vikram Vedha Hrithik Roshan Saif Ali Khan Share Special Post Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Entertainment
go to top