Rasika sunil: इंडस्ट्रीत एवढं स्वच्छ कुणीही नाही.. काय बोलून गेली रसिका सुनील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress rasika sunil comment on entertainment industry in sakal digital interview

Rasika sunil: इंडस्ट्रीत एवढं स्वच्छ कुणीही नाही.. काय बोलून गेली रसिका सुनील

rasika sunil: झी मराठी वरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली रसिका ही मराठीतील एक दमदार अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने साकारलेले शनाया हे पात्र आजही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. केवळ मालिकाच नाही तर चित्रपटातूनही तिने स्वतःला सिद्ध केले आहे. सध्या नवरात्री निमीत तिने छान नऊ रंगांच्या साड्या नेसून फोटोशूट केले आहे. याच नवरात्रीचे निमित्त साधून 'सकाळ डिजिटल'ने रसिकाची एक खास मुलाखत घेतली. यावेळी रसिकाने एक मोठे विधान केले. (actress rasika sunil comment on entertainment industry in sakal digital interview )

नवरात्री म्हंटलं की प्रत्येकामध्ये एक उत्साह संचारलेला असतो. देवीचा जागर, गरबा, दांडिया यामध्ये सर्वजन आनंदाने नाहून निघालेले असतात. नवरात्रीचे विशेष म्हणजे या नऊ दिवासात प्रत्येकजन नऊ रंग परिधान करत असतो. पांढरा, हिरवा, लाल, पिवळा, निळा असे विविध रंग यामध्ये असतात. यंदाच्या नवरात्रोत्सवाची सुरुवात पांढऱ्या रंगाने झाली. याच नऊ रंगांविषयी 'सकाळ' डिजिटलमध्ये रसिकाने दिलखुलास गप्पा मारल्या आहे.

मनोरंजनविश्वातील कोणत्या व्यक्तीला तू कोणत्या रंगात पहातेस? असा प्रश्न यावेळी रसिकाला विचारण्यात आला. यावेळीन नवरात्रीची सुरुवात पांढऱ्या रंगाने होत असल्याने ती म्हणाली, 'बापरे.. पांढरा रंग.. एवढं स्वच्छ.. आणि इंडस्ट्री मध्ये.. तू तर पेचातच टाकलंस मला. पांढरा रंग हा सात्विकतेचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे मी इतर कुणाचंही नाव न घेता हा रंग लता मंगेशकर यांना देऊ इच्छिते कारण त्यांचा आवाज तसा होता.' यावेळी रसिकाने मनोरंजन विश्वातील कुणालाही पांढरा रंग न दिल्याने हा आता चर्चेचा विषय ठरत आहे.