Raveena Tandon: पद्मश्री पुरस्कारानंतर रवीना टंडनची पोस्ट; म्हणाली.. माझे योगदान, माझी आवड.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress raveena tandon shared feelings post after get padma shri award

Raveena Tandon: पद्मश्री पुरस्कारानंतर रवीना टंडनची पोस्ट; म्हणाली.. माझे योगदान, माझी आवड..

Raveena Tandon : बुधवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अभिनेत्री रवीना टंडन हिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिनय विश्वातून पद्मश्री पुरस्कारासाठी यंदा रवीनाची निवड झाली. हा पुरस्कार मिळाल्यानंतर रवीनाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

बुधवारी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये ‘आरआरआर’चे संगीतकार एमएम कीरावानी आणि बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. यानंतर रवीनाने आपल्या भावना व्यक्त करत सर्वांचे आभार मानले आहे.

(actress raveena tandon shared feelings post after get padma shri award)

हेही वाचा: ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

''मला या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मला पद्मश्री पुरस्कार मिळाला यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. माझे आयुष्य, माझी आवड आणि उद्देश याद्वारे केवळ बॉलिवूडच नाही तर त्यापलीकडेही मी योगदान दिले आहे. त्याची दखल घेतल्याबद्दल भारत सरकारचे धन्यवाद. या प्रवासात ज्यांनी मला मार्गदर्शन केलं त्या सर्वांचे मी आभार मानते. यासाठी मी माझे वडील रवी टंडन यांची ऋणी आहे,” असं रवीना म्हणाली आहे.

रवीना टंडनने, १९९१ मध्ये ‘पत्थर के फूल’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने आतापर्यंत ‘अंदाज अपना अपना’, ‘मोहरा’, ‘दिलवाले’, ‘खिलाडियों के खिलाडी’, यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने २०२२ साली आलेल्या ‘KGF: Chapter 2’ मध्ये सहाय्यक भूमिका केली होती. तसेच क्राइम थ्रिलर मालिका ‘अरण्यक’मधून तिने ओटीटी पदार्पणही केले होते.