Marriage Anniversary:मित्राशी जुळवून देण्याच्या नादात स्वत:च सोनमच्या प्रेमात पडला आनंद अहुजा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Sonam Kapoor Fall in love with Anand Ahuja in 2015

Marriage Anniversary:मित्राशी जुळवून देण्याच्या नादात स्वत:च सोनमच्या प्रेमात पडला आनंद अहुजा

बॉलीवूडचे झगमगते सितारे म्हणत ज्यांची ओळख सगळ्यांना आहे त्यात मोठ्या पडद्यावर झळकणारे सगळे बॉलीवूड कलाकार येतात.यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ मधे काय चाल्लंय ते सगळ्यांना जाणून घ्यायचं असते.पण यात काही कलाकार त्यांचे खरे आयुष्य मात्र पडद्यामागे गुंडाळून ठेवतात.त्यांना त्यांच्या पर्सनल लाईफ बद्दल कोणाला माहिती करायचे नसते.त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे सोनम कपूर.आज तीचा आनंद अहुजाचा लग्नवाढदिवस.

२०१८ मधे आनंद आणि सोनम लग्नबंधनात अडकले होते.(Marriage Anniversary)या जोडप्याचं मुंबईत शाही लग्न झालं होतं.या जोडप्याला बाहेर बघताच यांचे फोटोज घ्यायला हजारोंची गर्दी असते.या आयडियल कपलने यावर्षी त्यांच्या घरी येणाऱ्या तान्ह्या पाहुण्याची गोड बातमी दिली आहे.हे जोडपं त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा करताय.

कशी सुरू झाली सोनम आनंदची प्रेम कहाणी ?

आनंद आणि सोनम प्रेम रतन धन पायो या सोनमच्या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी भेटले होते.त्यावेळी सोनमची मैत्रीण तीच्या मित्रासोबत सोनमचे जुळवून देण्याच्या प्रयत्नात होती.फिल्मफेअरच्या सोहळ्यात तीने या सगळ्यांचा खुलासा केला होता.एकदा तीच्या मित्रमंडळींनी तीला डेटवर जाण्याचा आग्रह केला होता.त्यात तीन चार त्यांच्या मित्रांनाही बोलवले होते.त्यात आनंदही होता.त्यावेळी यांची दुसरी भेट घडून आली. त्यांच्या पहिल्या भेटीनंतर लगेचच आनंदने सोनमशी फेसबुकवर संपर्क साधला.(Bollywood) विशेष म्हणजे आनंद अजून एका मित्रासाठी मधला माणूस बनण्याचा प्रयत्न करत होता पण सोनमने त्याला नकार दिला होता.हे दोघे नंतर फोनवर बोलू लागले आणि काही दिवसातच त्यांच्यात प्रेम फुलून आले.

या चार वर्षाच्या संसातील या जोडप्याचा प्रवास आता नविन वळणावर आहे.सोनम आणि आनंद आई होणार असून त्यांच्या पहिल्या बाळाची ते आतुरतेने वाट बघत आहेत.

Web Title: Actress Revealed How She Fall In Love With Anand Ahuja Celebrating Her Fourth Marriage

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top