
Rinku Rajguru : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयानं कमी वेळेत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणून रिंकु राजगुरुचं (rinku rajguru) नाव घेता येईल. प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' (sairat) या चित्रपटामध्ये रिंकुनं भूमिका केली होती. तिचा तो पहिला चित्रपट. त्यानंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही. सध्याच्या घडीला मराठी अभिनेत्रींमध्ये ती आघाडीची अभिनेत्री आहे. वेबसीरिज असो वा चित्रपट रिंकुनं दमदारपणे आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना जिंकून घेतलं आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या झुंड (jhund) आणि 'आठवा रंग प्रेमाचा' या चित्रपटांतून रिंकूने आपल्या अभिनयाची जादू दाखवली. रिंकु नुकतीच झी मराठी वरील 'बस बाई बस' या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिनं एका मागे लागलेल्या मुलाचा भयानक किस्सा सांगितला. (actress rinku rajguru participate in bus bai bus show on zee marathi host by subodh bhave)
गेली काही दिवस सुबोध भावेच्या 'बस बाई बस' या कार्यक्रमाची भलतीच चर्चा आहे. झी मराठी वाहिनीवरील 'बस बाई बस' या नव्या मालिकेत महिला कलाकार, राजकारणी सहभागी होतात यावेळी त्यांना इतर महिलांच्या मनातले प्रश्न विचारले जात आहेत. अशी भन्नाट संकल्पना असणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे (subodh bhave) करत आहे. या कार्यक्रमात आजवर अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने नुकतीच या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिने सैराट नंतरचा एक अनुभव सांगितला. एक मुलगा कशा विचित्र पद्धतीने तिच्या मागे लागला होता याचा हा किस्सा आहे.
रिंकू म्हणाली, 'आपण अनेक कार्यक्रमांना जातो. चाहत्यांबरोबर हात मिळवतो. अशाच एका कार्यक्रमाला गेले असता मी एका चाहत्याला बघून सहज हात दाखवला. माझ्या लक्षातही नव्हतं तो कोण होता. एके दिवशी अचानक तो घरी आला आणि माझ्या आई-बाबांना म्हणाला मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. तिने माझ्या डोळ्यात बघितलं आहे. ती रुक्मिणीचा अवतार आहे. मागच्या जन्मी मीही देव होतो. तर या जन्मी तुम्ही आमचं लग्न लावून द्या.'
पुढे ती म्हणाली, 'एवढंच नाही तर त्यानंतर तो अनेकदा माझ्या घरी यायचा. एकदा मी परिक्षेसाठी गेले होते. माझा पेपर संपल्यानंतर मी बाहेर आले. तेव्हा तो माझ्यासमोर पैशांची थैली घेऊन उभा होता. हे फारच भीतीदायक होतं. त्याने मला आणि माझ्या कुटुंबियांना खूप त्रास दिला. शेवटी आम्हाला पोलिसांत तक्रार करावी लागली.' असा भयानक अनुभव तिने यावेळी सांगितला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.