esakal | 'दिवस वाईट,पैसे संपले, घरच्यांनी सोडलं: ज्येष्ठ अभिनेत्रीची खंत
sakal

बोलून बातमी शोधा

actress savita bajaj

'दिवस वाईट,पैसे संपले, घरच्यांनी सोडलं: ज्येष्ठ अभिनेत्रीची खंत

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनाच्या काळात सर्वांनाच वेगवेगळ्या प्रकारच्या संकटाला तोंड द्यावे लागले आहे. कोरोनाचा मोठा फटका मनोरंजन क्षेत्राला (corona pandemic) बसला आहे. त्यामुळे कित्येक सेलिब्रेटींना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं आहे. यापूर्वी काही कलावंतांनी आपल्याला सामोऱ्या जाव्या लागलेल्या आर्थिक प्रश्नांबद्दल सोशल मीडियावर पोस्ट (social media post) शेयर केली होती. आता टीव्ही आणि चित्रपट क्षेत्रातील प्रख्यात अभिनेत्री सविता बजाज (actress savita bajaj) यांनी आपली परिस्थिती विशद केली आहे. (actress savita bajaj need of financial help says now its harder to manage yst88)

निशांत (nishant) , नजराना (najarana) आणि बेटा हो तो ऐसा (beta ho to aisa) या चित्रपटांतून तर नुक्कड (nukkad), मायका (mayka) आणि कवच सारख्या मालिकांमधून प्रेक्षकांची पसंती मिळवलेल्या सविता बजाज यांना त्यावेळी कदाचित अंदाज आला नसावा की, आपल्याला कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल. त्यामुळे आता त्यांना आर्थिक समस्येला तोंड द्यावं लागत आहे. म्हातारपणी आपल्याकडे पैसे नाहीत. अशी खंत त्यांनी सोशल मीडियावर बोलून दाखवली आहे.

सविता यांना ज्या परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे ती यापूर्वी अनेक कलाकारांनी पाहिली आहे. अजूनही ते त्यातून जात आहेत. यात कित्येक लोकप्रिय मालिकांचे प्रमुख कलाकारही आहेत. हिंदी आणि मराठीमधील कलांकारांपुढे अशा प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांच्या परिवारानं त्यांच्यासोबत राहायला नकार दिला आहे.त्यामुळे सविता या खचून गेल्या आहेत. वाईट वेळ ही काही सांगून येत नाही. सुख आणि दु;ख या आयुष्याच्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे आपण लक्षात घ्यायला हवे.

हेही वाचा: ‘देवमाणूस’मध्ये चंदाला पाहून अजितकुमारची हरपणार शुद्ध

हेही वाचा: देशमुख कुटुंबात गौरी घेणार अरुंधतीची जागा ?; पाहा विडिओ

यापूर्वी शगुफ्ता अली, बाबा खान यांच्यानंतर ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून सविता यांची हलाखीची परिस्थिती सुरु झाली आहे. त्यांनी त्याबाबत सोशल मीडियावर सांगितले आहे. सविता बजाज या कोरोनाच्या आजारानं त्रस्त होत्या. त्यानंतर त्यांना आर्थिक समस्येला सामोरं जावं लागत असल्याचे दिसून आले आहे. आजारपणात आपल्याकडचे सर्व पैसे संपले आहेत. त्यामुळे आता पुढे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. पैसे कसे जमा करायचे ही माझ्यापुढील मुख्य अडचण आहे.

loading image