esakal | ‘देवमाणूस’मध्ये चंदाला पाहून अजितकुमारची हरपणार शुद्ध
sakal

बोलून बातमी शोधा

 Devmanus

‘देवमाणूस’मध्ये चंदाला पाहून अजितकुमारची हरपणार शुद्ध

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'देवमाणूस' सध्या प्रचंड चर्चेत आहे. ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी ‘देवमाणूस’ ही मालिका झी मराठीवर आली, आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. (new actress entry in Devmanus serial)

सध्या मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि किती चतुराईने अजितकुमार त्याच्यावर लावलेले सर्व आरोप खोटे ठरवतो. कोर्टात आर्या या निष्णात वकिलाविरुद्ध अजितकुमार आपली बाजू अत्यंत निर्भीडपणे मांडतो आणि आपण देवीसिंग नसून डॉक्टर अजितकुमार देव आहोत हे सगळ्यांना पटवून देतो. ठोस पुराव्यांअभावी कोर्ट देखील अजितकुमारची सुटका करणार अशातच एका नवीन व्यक्तिरेखेची मालिकेत एंट्री होणार आहे. चंदा ही व्यक्तिरेखा लवकरच मालिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. ही भूमिका अभिनेत्री माधुरी पवार निभावणार आहे. टीव्हीवर अजितकुमारची निर्दोष सुटका होणार का? ही बातमी पाहून चंदा गोंधळात पडते. या चंदाचा चेहरा पाहून कोर्टात अजितकुमारची शुद्ध हरपते. ही चंदा नक्की आहे तरी कोण? हिचा आणि देवीसिंगचा काय संबंध आहे? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.या भूमिकेविषयी बोलताना माधुरी म्हणाली, "देवमाणूस ही मालिका अत्यंत रंजक वळणावर आली असून अशा वेळी या लोकप्रिय मालिकेत माझी चंदा या व्यक्तिरेखेतून एंट्री होणार आहे म्हणून खूप जास्त उत्सुक आहे. चंदा आणि देवीसिंग हे एकमेकांना ओळखतात पण ते एकमेकांना कसे ओळखतात आणि त्यांचा काय संबंध आहे हे प्रेक्षकांना लवकरच कळेल.

हेही वाचा: मुंबईच्या रस्त्यावर गाडी चालवून दाखवा; सुमित राघवनचे चॅलेंज

चंदा ही एका वेगळ्या शैलीची व्यक्तिरेखा आहे आणि ही भूमिका निभावताना मला थोडंसं दडपण होतं पण संपूर्ण टीमने मला सांभाळून घेतलं. माझ्या आधी साकारलेल्या भूमिकेइतकंच प्रेक्षक या भूमिकेवर देखील प्रेम करतील ही मला खात्री आहे."

हेही वाचा: 'वाघाचं काळीज पाहिजे'; चाहत्याच्या कमेंटवर अमृताचे उत्तर

loading image