Sayali Sanjeev: माझ्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवांचा.. म्हणत सायली संजीवने घेतला चांगलाच समाचार.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress sayali sanjeev talks on rumours on her relationship and how does she handle that

Sayali Sanjeev: माझ्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवांचा.. म्हणत सायली संजीवने घेतला चांगलाच समाचार..

Sayali Sanjeev : लाखो तरुणांच्या मनाला भुरळ घालणारी अभिनेत्री सायली संजीव गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चेत आहे. तिने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचा 'हर हर महादेव' चित्रपट असो 'गोष्ट एका पैठणीची'.. किंवा आताच आलेला 'सातारचा सलमान'.. सध्या संपूर्ण वातावरण सायलीमय झाले आहे.

सायलीच्या कामाची कायमच चर्चा होत असते पण तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक चर्चा आजवर झालेल्या आहेत. अनेक अफवा तिच्याविषयी उठवल्या गेल्या आहेत. याविषयी तिने अत्यंत परखडपणे आपले विचार मांडले आहेत.

(actress sayali sanjeev talks on rumours on her relationship and how does she handle that)

सायली संजीव हिने नुकतीच ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याला हजेरी लावली. ‘चर्चा रंगणार बातमी गाजणार’ ही या कार्यक्रमाची यावर्षीची टॅगलाईन आहे. याच निमित्ताने तिने ‘सेलिब्रिटी कट्टा’ या यूट्यूब चॅनलला तिने मुलाखत दिली.

यावेळी सायलीने तिच्या विषयी रंगणाऱ्या अफवा, ट्रोलिंग याला ती कसं तोंड देते याविषयी बोलली आहे. सायली म्हणाली, 'माझ्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवांचा मला कधीही त्रास होत नाही. एक दोन वेळा झाला असेल थोडा पण ठीक आहे. आपण त्यांना अफवा म्हणतो म्हणजेच ती खोटी गोष्ट आहे. त्यामुळे कधी ना कधी खरी गोष्ट लोकांसमोर येईलच. त्यामुळे कशाला त्याबद्दल एवढा विचार करून स्वतःला त्रास करून घ्यायचा.'

मराठी मनोरंजन विश्वात सायली कुणाच्या प्रेमात आहे याविषयी बऱ्याच चर्चा झाल्या पण प्रामुख्याने तीचं नाव जोडलं गेलं तर क्रिकेटर ऋतुराज गायकवाड याच्याशी.. या अफवा इतक्या पसरल्या की सायलीला अखेर यावर स्पष्ट मत मांडून हे प्रकरण थांबवाव लागलं. त्यांच्यात काहीही नसल्याची स्पष्टता सायलीने दिली. त्यामुळे सायली वारंवार तिच्यावर होणाऱ्या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देत आली आहे.

टॅग्स :sayali sanjeev