'एवढी कसली घाई होती शनाया! कपडे घालताना चुकली म्हटल्यावर...'|Actress shanaya Kapoor Instagram video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Shanaya kapoor

'एवढी कसली घाई होती शनाया! कपडे घालताना चुकली म्हटल्यावर...'

Entertainment News: आपल्या हटके स्टाईलमुळे चाहत्यांच्या चर्चेत असणाऱ्या सेलिब्रेटींची बॉलीवूडमध्ये काही कमी नाही. त्यात अभिनेता संजय कपूर आणि (Sanjay kapoor) महिप कपूर (Mahip Kapoor) यांच्या शनाया कपूर (Shanaya Kapoor) यांच्या मुलीचं नाव घ्यावं लागेल. अजुन बॉलीवूडमध्ये म्हणावं असं यश काही तिच्या वाट्याल आलेलं नाही. मात्र ती तिच्या कपड्यांवरुन नेहमीच चर्चेत असते. आताही तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून (viral News) आले आहे. त्यामध्ये तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणे, तिनं ड्रेस परिधान करताना केलेली चूक. ती चूक त्या व्हिडिओमध्ये दिसुन आल्यानं नेटकऱ्यांनी तिला चांगलेच सुनावले आहे. शनाया आता बॉलीवूडमध्ये एंट्री करणार आहे.

बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या एका चित्रपटातून शनाया बॉलीवूडमध्ये डेब्यु करणार आहे. मात्र त्यापूर्वी ती पुन्हा एका वादात सापडल्याचे दिसून आले आहे. शनाया ही तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. ती नेहमीच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन हॉट फोटो शेयर करत असते. अनेकदा तिला तिच्या चुकीमुळे नेटकऱ्यांकडून बोलणीही खावी लागली आहे. जसं की आता तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तिनं ग्रीन कलरचा एक टॉप घातला आहे. त्यामुळे तिला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. ती एका हॉटेलमध्ये चालली आहे. मात्र त्याचवेळी त्या व्हिडिओतून नेटकऱ्यांना काही चूकीचं दिसुन आलं. त्यांनी लागलीच शनायाला त्यावरुन डिवचले आहे. तिला शहाणपणाच्या दोन चार गोष्टीही सांगितल्या आहेत.

हेही वाचा: Video : जर्सी क्रमांक 7 अन् मुंबईची सर्वात खराब कामगिरी; रोहितने पकडलं डोकं

त्या ड्रेसवर प्राईज टॅग तसाच राहिला असल्याचे व्हिडिओतून दिसून आले आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी शनायाला प्रश्न विचारले आहेत. ड्रेस घालताना तुला एवढी कसली घाई झाली होतीय़? तुला त्या ड्रेसचा प्राईज टॅग काढायला देखील वेळ मिळाला नाही. एका युझर्सनं तिला कमेंटस मध्ये लिहिलं आहे की, एकदा हा ड्रेस परिधान केल्यावर तो पुन्हा वापरायचा नाही असं काही ठरवलं आहेस का, अशाप्रकारे शनायाला नेटकऱ्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली आहे. तिच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ती बेधडकमधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा पोस्टर्स काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते.

हेही वाचा: Video viral: सुजल जगदाळे उर्फ बुलट कुठं बसलंय बघा! पेपर सोडून आला बैलगाडा शर्यतीत

Web Title: Actress Shanaya Kapoor Instagram Video Viral Trolled Dress Price Tag

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top