
शिल्पाने लावली OTT वर आग..पहा तीच्या एन्ट्रीचा दमदार अंदाज
अलीकडेच शिल्पाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील पोस्टवरून तीच्या ओटीटीच्या पदार्पणाचा अंदाज लावण्यात आला होता.तशी खळबळही सोशल मीडियावर बऱ्याच दिवसापासून सुरू होती.त्यामुळे शिल्पाला परत एकदा अभिनय करताना बघण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.शिल्पाने नुकत्याच शेअर केलेल्या इंन्स्टाग्राम पोस्टने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढलेली आहे.
रोहित शेट्टीने देखिल त्याच्या सोशल मीडियाला पोस्ट टाकत शिल्पाचे वेलकम केले आहे.शिल्र्पा शेट्टी सिद्धार्थ मल्होत्रा या अभिनेत्याबरोबर ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे.तीच्या कडक एन्ट्रीतला फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.प्रेक्षकांप्रमाणेच मीदेखील माझ्या या ओटीटीतल्या नवीन प्रवासासाठी उत्सुक आहे.'रोहित शेट्टीच्या या कॉप युनिवर्समधे काम करणे माझ्यासाठी थ्रिलींग असणार आहे.असे काहीसे कॅप्शन देत तीने सोशल मीडियाला पोस्ट शेअर केली आहे.'असे काहीसे कॅप्शन देत तीने सोशल मीडियाला पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा: Shilpa Shetty : शिल्पा शेट्टी कुंद्रा पोहोचली 'द कपिल शर्मा शो'मध्ये | Sakal Media |
काळ्या वेशभूषेत ती हातात गन घेऊन आगीच्या थ्रील्ड क्रिएट करणाऱ्या पोस्टरमधे दिसतेय.तीच्या या काळ्या रंगाच्या या पोषाखावर पोलीस असेही लिहीलेले आहे.काळा गॉगल लावत आणि आगीच्या थारोळ्यात कमाल लूक देत शिल्पाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.रोहित शेट्टीच्या या डिजीटल शो चा टेक ऑफ सुश्वांत प्रकाश याच्या डेब्युट एन्ट्रीने होणार असल्याची माहिती पुढे येतेय.तसेच ही कॉप बेस सिरीज असून प्रेक्षकांना डिजीटल प्लॅटफॉर्मवर जे अपेक्षित असतं त्यापेक्षा काहीशी वेगळी असणार असल्याची माहिती पुढे येतेय.
Web Title: Actress Shilpa Shetty Shared Her First Photo Of Her Ott Entry On Social Media
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..