अभिनेत्रीने लगावली राहुल महाजनच्या कानशिलात...

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 जुलै 2019

अभिनेत्रीने राहल महाजनच्या कानशिलात लगावली. त्यामुळे राहुल पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे.

मुंबईः भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे सुपूत्र राहुल महाजन हा विविध कारणांमुळे चर्चेत असतो. पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे, ते म्हणजे एका अभिनेत्रीने त्याच्या कानशिलात लगावली.

खासगी वाहिनीवर सुरू असलेल्या 'नच बलिए' या मालिकेच्या सेटवर हा किस्सा घडला आहे. अभिनेत्री श्रेनू पारिखने राहलच्या कानशिलात लगावली. त्यामुळे राहुल पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे.

अभिनेत्री श्रेनू पारिख आणि राहुल हे दोघेही नच बलिएच्या ग्रॅण्ड प्रिमियरमध्ये परफॉर्म करणार आहेत. या डान्सचा एक भाग म्हणून श्रेनुनीला राहुलच्या कानशिलात लगावायची होती. त्यामुळे तिने राहुलच्या कानशिलात लगावली. मात्र, त्यांच्या या अॅक्टची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

राहुलच्या कानशिलात मारणे श्रेनुनीला शक्य होत नव्हते, ती संकोचली होती. मात्र तिची ही अडचण राहुलने दूर केली. त्याने सेटवरील वातावरण बदललं आणि श्रेनूनीला हा सीन करण्यास प्रोत्साहित केले. अखेर, श्रेनूने राहुलच्या कानशिलात मारलीच.

राहुलच्या कानशिलात लगावल्यानंतर श्रेनू म्हणाली, 'राहलुच्या कानशिलात लगावणे माझ्यासाठी खूप कठीन होते. पण, राहुलने मला प्रवृत्त केले आणि हा सीन पार पडला. राहुलसोबत काम करताना खूप छान वाटत आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actress Shrenu Parikh slaps Rahul Mahajan