esakal | 'खरं खोट रेमडेसिव्हिर कसं ओळखणार'?, सोफीनं सांगितली आयडिया
sakal

बोलून बातमी शोधा

actress sophie chaudhary

'खरं खोट रेमडेसिव्हिर कसं ओळखणार'?

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनाचा वाढता कहर सर्वांसाठी डोकेदुखीचा विषय ठरतो आहे. त्यामुळे या कोरोनाच्या संकटाला कसे सामोरं जावं असा प्रश्न सर्वांना पडला आहे. राज्य शासनानं सर्वोतोपरी प्रयत्न करुनही कोरोनाला आटोक्यात ठेवणं सोपं नसल्याचेही दिसुन आले आहे. अशावेळी बॉलीवूडमधील सेलिब्रेटींनी अनेकांना कोरोनाच्या दरम्यान काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सध्या बाजारात रेमडेसिव्हरचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. दुसरीकडे नागरिकांची फसवणूकही होत आहे. अशावेळी बॉलीवूडची अभिनेत्री सोफी चौधरीनं ख-या खोट्या रेमडेसिव्हर यात नेमका काय फरक आहे हे तिनं सांगितलं आहे.

सोफीनं याबाबतची अधिक माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. सध्या संपूर्ण देशातील रुग्णालयांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. रुग्णांची मोठ्या प्रमाणात लुट सुरु आहे. अशावेळी काय करावं असा प्रश्न रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांसमोर आहे. अलीकडच्या काही दिवसांपूर्वी कोरोनावर प्रभावी असणा-या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळा बाजारही मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

एकीकडे कोरोना व्हॅक्सिनचा तुटवडा भासत असताना दुसरीकडे रेमडेसिव्हरचा होणारा काळाबाजार सर्वांची डोकेदुखी वाढवणारा विषय ठरला आहे. देशातील अनेक रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांनी यापूर्वी रेमडेसिव्हिरच्या बाबत तक्रारी नोंदवल्या आहेत. अशा सगळ्या परिस्थितीत अभिनेत्री आणि गायिका सोफी चौधरीनं बाजारात विकल्या जाणा-या रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या बाबत महत्वाची माहिती शेअर केली आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्शन्स हे प्लाझ्मा थेरपी आणि कोरोनापासून बचाव यासाठी महत्वाची मानली गेली आहे. यासगळ्या परिस्थितीवर तिनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

सोफीनं व्टिट करुन दोन फोटो शेअर केले आहेत. त्यात एक फोटो ख-या इंजेक्शन्स आणि दुस-या इंजेक्शन्सचा आहे. त्यात मुळ फरक स्पेलिंगचा असल्याचा दर्शविण्यात आले आहे. हा फोटो शेअर करुन सोफिय़ानं नकली रेम़डेसिव्हिर इंजेक्शन्सपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

loading image