लग्नासाठी स्वराच्या भन्नाट अटी; स्वयंपाक येत नाही, चहा कधीतरीच होतो चांगला!

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 6 March 2021

स्वरा अजून अविवाहीत आहे. त्यामुळे आपल्याला लग्नसाठी मुलगा हवा आहे अशा अर्थाची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

मुंबई - अभिनेत्री स्वरा वेगवेगळ्या गोष्टींसाठी सोशल मीडियावर चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. तिचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. वेगवेगळ्या गोष्टींवरुन कधी सरकारच्या बाजूनं तर कधी सरकारच्या विरोधात भूमिका घेणारी स्वरा आता वेगळ्या कारणावरुन सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. भलेही स्वराचे म्हणणे बॉलीवूडमधील अनेकांना पटत नसेल पण तिची सर्वांबरोबरची मैत्री सर्वश्रृत आहे. कंगणाची आणि तिची मैत्री तसेच त्या दोघींमधील वादही सर्वांना माहिती आहे. स्वरानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे ती अनेकांच्या चेष्टेचा विषय ठरली आहे.

स्वरा अजून अविवाहीत आहे. त्यामुळे आपल्याला लग्नसाठी मुलगा हवा आहे अशा अर्थाची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यामुळे ती ट्रोलही होत आहे. स्वरानं आपल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, आपल्याला तर अॅरेंज मॅरेज करायचे आहे. याप्रसंगी स्वरानं आपलाच एक फोटो शेअर केला आहे. ती म्हणते, या मुलीला स्वयंपाक काही येत नाही. चहा कधी कधी चांगला होतो. तिच्या सोबत एक कुत्राही आहे. त्याला ती आपला मुलगा समजते. तिच्या डोक्यात कधी कधी बंडखोरीचे विषय येतात. त्यानुसार ती आपली भूमिका मांडत असते. तिच्यावर आंदोलनजीवी आणि देशद्रोही असल्याचा शिक्काही मारण्यात आला आहे. अशी एका चांगल्या घरातील मुलाला चांगला नवरा हवा आहे. असे स्वरानं म्हटलं आहे.

स्वराच्या या व्टिटला मोठ्या प्रमाणावर चाहत्यांनी कमेंटस दिल्या आहेत. स्वरानंही त्याचा पॉझिटिव्हली पाहिले आहे. दिल्लीत चाललेल्या शेतकरी आंदोलनावर स्वरानं सरकारविरोधी भूमिका घेतली होती. त्यामुळे ती वादाच्या भोव-यात सापडली होती. शेतक-यांना सरकारनं तातडीनं न्याय द्यावा अशी भूमिका स्वरानं घेतली होती. स्वराचा हा अंदाज कंगणाला आवडला नव्हता. तिनं त्याला खडसावले होते. स्वराची भूमिका चूकीची असल्याचे म्हणणे कंगणाचे होते. वास्तविक या दोघी चांगल्या मैत्रीणी आहेत. त्यांनी तनु वेडस मनु नावाच्या चित्रपटात एकत्र काम केले होते. 

तसे स्वरा तिच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तव्यामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या सुटेबल बॉय वरुन वाद रंगला होता. त्यात स्वरानं उडी घेतली होती. त्याप्रकरणी स्वरा म्हणाली होती की,  मंदिरातील किसिंग सीनवर स्वराने त्या सीनला विरोध करणा-यांना खडे बोल सुनावले होते. यावेळी तिनं कठूआ बलात्कार प्रकरणाची आठवण विरोधकांना करुन दिली होती. बीबीसीची निर्मिती असलेल्या अ सुटेबल बॉय या मालिकेला जाणकार प्रेक्षक, अभ्यासक यांची पसंती मिळाली होती. मात्र त्यातील एका किसिंगच्या दृश्यावर काही राजकीय, धार्मिक संघटनांनी घेतलेल्या आक्षेपामुळे ती मालिका वादाच्या भोव-यात सापडली होती. यासगळ्याचा परिणाम म्हणजे ती मालिका प्रसारित करणा-या नेटफ्लिक्सवर बंदी घालण्याची मागणी त्या संघटनांनी केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actress swara bhaskar tweet related marriage some funny demand viral on social media